आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅगाेन आंतरराष्ट्रीय टेनिस : सानिया-मार्टिना अंतिम आठमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईस्टबाेर्न - अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसने विजयी माेहीम अबाधित ठेवताना अ‍ॅगाेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या जाेडीने महिला दुहेरीच्या अंतिम १६ मधील सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. सानिया-मार्टिनाने लढतीत कॅराेलिना प्लिसकाेवा आणि मिशेला क्राइजेकचा ६-०, ६-२ अशा फरकाने पराभव केला.

या सामन्यातील विजयासह अव्वल मानांकित जाेडीने अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला. या जाेडीने अवघ्या ४५ मिनिटांमध्ये धडाकेबाज विजय मिळवला. दमदार सुरुवात करताना सानिया-मार्टिनाने पहिला सेट सहज जिंकला. त्यानंतर आपली ही लय कायम ठेवत अव्वल मानांकित जाेडीने दुसर्‍या सेटमध्येही बाजी मारली. आता अव्वल मानांकित जाेडीचा अंतिम आठमधील सामना तैपेईच्या हाआे चिंग चान आणि इटलीच्या फ्लाविया पेनेटाशी हाेईल.

या सामन्यातही आपली विजयी लय कायम ठेवण्याचा अव्वल मानांकित सानिया आणि मार्टिनाचा प्रयत्न असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...