आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झा-मार्टिना उपांत्य फेरीत दाखल; डब्ल्यूटीए फायनल्स : अमेरिकेच्या मॅडिसनचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर- नंबर वन सानिया मिर्झाने अापली सहकारी मार्टिना हिंगीससाेबत शुक्रवारी डब्ल्यूटीए
फायनल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे जर्मनीची अँजेलिक
कर्बर अाणि स्लाेव्हाकियाची डाेमिनिका सिबुलकाेवाने उपांत्य फेरी गाठली.

दुसऱ्या मानांकित सानिया अाणि मार्टिनाने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात
चीनच्या हाअाे-चिंग चान-युंग जान चानला धूळ चारली. त्यांनी ७-६, ७-५ ने सामना
जिंकला. यासह सानिया मार्टिनाने सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला.
कर्बरने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत शानदार एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने
लढतीत अमेरिकेच्या मॅडिसनला धूळ चारली. कर्बरने ६-३, ६-३ अशा फरकाने सामना
जिंकला. तिने अाक्रमक खेळीच्या बळावर सरळ दाेन सेटमध्ये विजय मिळवला.
मॅडिसनला फार काळ अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही. तिने दिलेली शर्थीची
झुंज अपयशी ठरली.

सिबुल काेवाची सिमाेनावर मात :स्लाेव्हाकियाच्या सिबुलकाेवाने महिला एकेरीच्या
अंतिम अाठमध्ये राेमानियाच्या सिमाेना हालेपचा पराभव केला. तिने ६-३, ७-६ ने
राेमहर्षक विजय मिळवला. यासाठी तिला दुसऱ्या सेटवर झंुज द्यावी लागली. मात्र,
यात सरस खेळी करताना तिने शानदार विजय साकारला. यासह तिने उपांत्य फेरीत
धडक मारली.
बातम्या आणखी आहेत...