आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sania Mirza, Martina Hingis Reach US Open 2015 Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन आोपन टेनिस स्पर्धा : सानिया, पेस फायनलमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क - जगातील नंबर वन दुहेरीची खेळाडू सानिया मिर्झा आणि भारताचा अनुभवी टेनिस स्टार लिएंडर पेसला ग्रँडस्लॅमचा किताब जिंकण्याची संधी आहे. भारताच्या या दाेन्ही खेळाडूंनी स्विसच्या मार्टिना हिंगीससाेबत गुरुवारी अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेच्या आपापल्या गटाची फायनल गाठली. स्विसच्या मार्टिना हिंगीससाेबत भारताच्या सानियाला दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे महिला एकेरीत जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स आणि नाेवाक याेकाेविकने पुरुष एकेरीतील आपली विजयी माेहीम अबाधित ठेवली.

७७ मिनिटांत सानिया-मार्टिना विजयी
विम्बल्डन चॅम्पियन सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसने गुरुवारी अवघ्या ७७ मिनिटांत महिला दुहेरीचा उपांत्य सामना जिंकला. यासह या अव्वल मानांकित जाेडीने दुहेरीची फायनल गाठली. अव्वल मानांकित जाेडीने उपांत्य लढतीत ११ व्या मानांकित सारा इराणी आणि प्लेविया पेनेट्टाचा पराभव केला. सानिया-मार्टिनाने ६-४, ६-१ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. या शानदार विजयाच्या बळावर या जाेडीने फायनल गाठली. सरळ दाेन सेटवरील पराभवाने सारा आणि फ्लेवियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अव्वल मानांकित जाेडीने विजयासाठी एक एेस आणि ३० विनर्स मारून उपांत्य सामना आपल्या नावे केला. दमदार सुरुवात करताना या जाेडीने ४९ मिनिटांत पहिल्या सेटमध्ये बाजी मारली आणि लढतीत आघाडी मिळवली. त्यानंतर आपली आक्रमक खेळी कायम ठेवून दुसरा सेट २८ मिनिटांत जिंकला. यासह त्यांनी सामना जिंकून फायनल गाठली. आता फायनलमध्ये बाजी मारून सत्रातील दुसरे ग्रँडस्लॅम आपल्या नावे करण्याचा या जाेडीचा प्रयत्न असेल. यासाठी ही जाेडी उत्सुक आहे.

पेस-मार्टिना अंतिम फेरीत
महिला दुहेरीत सानियासाेबत अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या मार्टिनाने लिएंडर पेससाेबत मिश्र दुहेरीची फायनल गाठली. पेस आणि मार्टिना या चाैथ्या मानांकित जाेडीने उपांत्य सामन्यात दुसर्‍या मानांकित राेहन बाेपन्ना आणि युंग जान चानचा पराभव केला. पेस आणि मार्टिनाने ६-२, ७-५ ने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या जाेडीला दुसर्‍या सेटमध्ये बाेपन्ना आणि जानने चांगलेच झुंजवले. मात्र, टायब्रेकरपर्यंत रंगलेला हा सेट जिंकून चाैथ्या मानांकित जाेडीने सामना आपल्या नावे केला.

मार्टिनाला दुहेरी मुकुटाची संधी
स्विसच्या मार्टिना हिंगीसला अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी आहे. तिने गुरुवारी सलग दाेन विजयासह वेगवेगळ्या गटाची अंतिम फेरी गाठली. तिने लिएंडर पेससाेबत मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. याशिवाय तिने महिला दुहेरीत आपली सहकारी सानिया मिर्झासाेबत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या या दाेन्ही खेळाडूंसाेबत दुहेरीच्या दाेन्ही फायनल जिंकून दाेन ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावे करण्याचा तिचा प्रयत्न असेल.

राॅजर फेडररसमाेर वावरिंका
पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत स्विसकिंग राॅजर फेडररसमाेर फ्रेंच आेपन चॅम्पियन वावरिंकाचे तगडे आव्हान असेल. हे दाेन्ही अव्वल खेळाडू उपांत्य लढत जिंकून फायनल गाठण्यासाठी झंुजतील. फेडररने अंतिम आठमध्ये रिचर्ड गास्केचा ६-३, ६-३, ६-१ ने ८७ मिनिटांत पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसरी उपांत्य लढतीत जगातील नंबर वन याेकाेविक व गतविजेता मरीन सिलीच समाेरासमाेर असतील.

एकेरीच्या उपांत्य लढती
पुरुष
{ नाेवाक याेकाेविक विरुद्ध मरिन सिलिच
{ राॅजर फेडरर विरुद्ध वावरिंका

महिला
{ सेरेना विल्यम्स विरुद्ध राॅबर्ट व्हिन्सी
{ सिमाेना हालेप विरुद्ध फ्लेविया पेनेट्टा