आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Martina Hingis Start 2016 With A Bang, Win Brisbane International Title

ब्रिस्बेन: सानिया मिर्झा-मार्टिना महिला दुहेरीत चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीस सत्रातील पहिल्याच टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरल्या. या जाेडीने सत्राला दमदार सुरुवात करताना शनिवारी ब्रिस्बेन अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. या अव्वल मानांकित जाेडीने फायनलमध्ये एंजेलिक केर्बर व अांद्रेया पेत्काेविकचा ७-५, ६-१ ने पराभव केला. सानिया अाणि मार्टिनाने ६९ मिनिटांत फायनल जिंकली.

व्हिक्टाेरिया अझारेंकाला एकेरीचे जेतेपद
बेलारुसची व्हिक्टाेरिया अझारेंकाने महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने महिला एकेरीच्या फायनलमध्ये इटलीच्या एंजेलिक केर्बरवर ६-३, ६-१ ने मात केली.

फेडरर-राअाेनिक अाज फायनल : पुरुष एकेरीच्या किताबासाठी रविवारी फायनल रंगणार अाहे. स्वीसकिंग राॅजर फेडरर व कॅनडाचा मिलाेस राअाेनिक अंतिम सामन्यात झंुजणार अाहे. थिमैनचा पराभव करून फेडररने सत्रातील पहिली फायनल गाठली.