आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'खेलरत्‍न\'साठी सानियाच्‍या नावाची होऊ शकते शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘खेलरत्न’साठी टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्‍या माहितीनुसार सानिया किंवा तिच्या वतीने कोणीही या पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे तिच्‍या नावाची शिफारस होऊ शकते.
'सानियाने भारतीय टेनिसला दिलेले योगदान विसरता येणार नाही, गेल्या वर्षभरात तिने चमकदार कामगिरी केली आहे', अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. सानियाने नुकतेच मार्टिना हिंगिसच्या साथीने महिला दुहेरीमध्‍ये विम्बल्डन विजेतेपद मिळवले. महिला टेनिसमध्ये दुहेरीच्या क्रमवारीत ती सध्या अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
याआधी सानियाचा गौरव
अर्जून पुरस्‍कार - 2004
पद्मश्री पुरस्‍कार - 2006
यांनी केला खेलरत्‍नसाठी अर्ज
खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल, थाळीफेकपटू सीमा अंतिल व विकास गौडा, हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग, अॅथलीट टिंटू लुका, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पॅराअॅथलीट एचएन गिरिशा आदींनी अर्ज केला आहे.