आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Reached On Top In Annual Performance

सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वल, नाेवाक याेकाेविकला पिछाडीवर टाकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिला दुहेरीतील वर्ल्ड नंबर वन सानिया मिर्झाने वर्ल्ड टेनिसमध्ये सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकला पिछाडीवर टाकले. यंदाच्या सत्रामध्ये महिला दुहेरीचे दहा किताब जिंकून तिने या यशाला गवसणी घातली. पुरुष एकेरीचा जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकला यंदाच्या सत्रात अातापर्यंत ९ विजेतेपदे जिंकता अाली. अद्याप सत्रात शिल्लक असलेल्या दाेन स्पर्धांमध्येही याेकाेविक खेळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे अजिंक्यपदामध्ये काेण अाघाडीवर अाहे, हे वर्षाच्या शेवटी समजेल.
सानियाने अापली सहकारी मार्टिना हिंगीससाेबत रविवारी सिंगापूरमध्ये वर्षातील शेवटच्या स्पर्धेत दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिचा यंदाच्या सत्रातील हा दहावा किताब ठरला. तसेच हा तिचा मार्टिनासाेबतचा नववा किताब अाहे. यंदाच्या सत्रातील सुरुवातीलाच सानियाने झिम्बाव्वेच्या कारा ब्लॅकसाेबत पहिले जेतेपद पटकावून अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली.