आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Sister Engagement Ceremony In Hyderabad Fresh Photos

सानिया मिर्झाच्या बहिणीच्या साखरपुड्याचे Fresh Photos, बघा पूर्ण अल्बम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहिण अनम हिच्या साखरपुड्याचे नवीन फोटो जाहिर झाले आहेत. सानियाने या इव्हेंटमध्ये चॉकलेट ब्राऊन कलरचा ड्रेस आणि हेवी इअरिंग्ज घातले होते. तिच्या या लुकवर मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी तो डिझाईन केला होता. सानियाने इंस्टाग्रामवर बहिणीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. 16 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये हा साखरपुडा झाला होता.
मिर्झा कुटुंबीयांचे डिझायनर ड्रेसेस
अनम मिर्झाचा ड्रेसही मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केला होता. तिने लाईट पिंक कलरची वर्क केलेली घागरा-चोली परिधान केला होता. यासह डायमंड चोकर (नेकपीस), मांग टीका, झुमकी आणि डायमंड कडा कैरी घातली होती. सानिया-अनाम यांची आई नसीम मिर्झा यांनी पिंक गोल्डर आऊटफिट परिधान केला होता. शांतनू-निखिल यांनी हा डिझाईन केला होता.
असा झाला कार्यक्रम
साखरपुड्याचा कार्यक्रम हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये झाला. यात नातलग आणि मिर्झा कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांना बोलविण्यात आले होते. पाहुण्यांना हैदराबादी व्यंजन वाढण्यात आले.
अकबर राशिद आहे नवरदेव
अनमचा साखरपुडा अकबर राशिद याच्यासोबत झाला. तो हैदराबादचा मोठा बिझनेसमन आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे पब्लिक इव्हेंटमध्ये सोबत दिसत होते. दोघे एका वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सानिया मिर्झाच्या बहिणीच्या साखरपुड्याचे फ्रेश फोटो...