आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza\'s Name Clear For Rajiv Gandhi Khel Ratna Award

सानिया ठरली \'खेलरत्न\' मिळवणारी पहिली महिला टेनिसपटू, रोहितला अर्जून पुरस्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताची स्‍टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला यंदाचा ‘राजीव गांधी खेलरत्न' हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सानियाच्या नावाची शिफारस केल्यानंतर आता पुरस्कार समितीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवाय रोहित शर्मासह इतर 17 खेळाडूंना अर्जून पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. हॉकीचे जादूगर मेजर ध्‍यानचंद यांच्‍या जन्‍मदिनी म्‍हणजे 29 ऑगस्‍ट रोजी सानियाला हा पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात येणार आहे.
पुरस्‍कार समितीने आज (मंगळवार) याबाबत निर्णय घेतला आहे. यंदाच्‍या मौसमात सानियाने दमदार कामगिरीने वाहवा मिळवली. तिने स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने विम्‍बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तिच्‍या कारकिर्दीत महिला दुहेरीत प्रथमच ग्रँड स्लॅम विजेतेपदही तिला पटकावता आले. याशिवाय तिने यंदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही मिळविले आहे. सानियाच्‍या या दमदार कामगिरीचे देशभर कौतूक होत असताना तिच्‍या कारकिर्दीची दखल घेण्‍यात आली अशा प्रतिक्रीया तिच्‍या चाहत्‍यांमधून येत आहेत.