आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झाची बहीण चढणार बोहल्यावर, उद्योगपतीसोबत थाटणार संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबियांना डबल सेलिब्रेशनची संधी मिळाली आहे. क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा 'खेळरत्न' पुरस्कारासाठी सानियाची निवड झाली आहे. तसेच दुसरीकडे तिची बहीण अनाम लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हैदराबाद येथील प्रसिद्ध उद्योजक अकबर रशीदसोबत अनाम संसार थाटणार आहे.
अकबराची होणार 'अनाम':
सानिया मिर्झाची धाकटी बहीण अनाम हिचा विवाह हैदराबाद येथील उद्योगपती अकबर राशीद यांच्याशी होणार आहे. मागील काही दिवसांपासून हे कपल सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असल्याचे दिसत आहे.
अनामने दिला दुजोरा...
अनाम मिर्झाने सांगितले की, ती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. हैदराबादेत येत्या 16 सप्टेंबरला पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
अनाम हिने मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मात्र, ती सध्या ब्युटीशियन म्हणून काम करत आहे. अनाम हिने अनेकदा सानियाचा मेकअप देखील केला आहे. बहिणीप्रमाणेच ती स्पोर्ट्समध्येही अॅक्टिव आहे. ती पिस्तुल शूटर असून तिने अनेक स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
सुरू झाली विवाहाची तयारी...
मिर्झा फॅमिलीने विवाहाची तयारी सुरु केली आहे. अनाम तिच्या आईसोबत मुंबईत शॉपिंगसाठी आली होती. अनाम हिने डायमंड नेकलेस खरेदी केला आहे. या नेकलेसचे डिझाईन मोनी अग्रवाल ‍यांनी केली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सानियासह अनाम मिर्झाचे काही फोटोज...