आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza\'s Younger Sister Anam Mirza Getting Married To Akbar Rasheed

PHOTOS: हा आहे सानियाच्‍या बहिणीचा दुल्‍हेराजा, किंग खानची फॅन आहे अनाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकबर राशिदसोबत अनाम मिर्झा. - Divya Marathi
अकबर राशिदसोबत अनाम मिर्झा.
भारतीय टेनिस स्‍टार सानिया मिर्झाची बहीण अनाम हिचे लवकरच लग्‍न होणार आहे. हैदराबादमध्‍ये या लग्‍नाची तयारीही सुरू झाली आहे. अकबर राशिद नावाच्‍या युवकासोबत तिचे लग्‍न होणार आहे. अकबर हैदराबादमध्‍ये बिझनेसमन आहे. ते दोघेही खुप दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. आपण अकबरसोबत लग्‍न करणार असल्‍याचा खुलासा अनाम मिर्झाने स्‍वत: केला आहे. 16 सप्‍टेंबरला हैदराबादेत पारंपरिक पद्धतीने हे लग्‍न होणार आहे.
कोण आहे अनाम
अनाम ही टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहीण आहे. तिने मास कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे. सानियाप्रमाणे खेळातही ती सक्रीय आहे. नेमबाजीसह इतर क्रीडा स्‍पर्धेत ती सहभागी झाली आहे. उत्‍कृष्‍ठ रंगभूषा करून सानियाला तिने कित्‍येक इव्‍हेंटसाठी तयार केले आहे.
किंग खानची फॅन
अनाम ही सिनेस्टार शाहरुख खानची फॅन आहे. शाहरूखची काही फोटोही तिने घरी लावली आहेत. ट्विटरवरही तिने शाहरुखसोबतची फोटो शेयर केली आहेत. अनाम आयपीएलच्‍या सामन्‍यांदरम्‍यान स्टेडियमवर दिसून आली होती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सानियाची लहान बहीण अनामची काही फोटो...