आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sania Said: Shoaib Is All The Players And Know That My Children? Doctor Can Be ...

सानिया म्हणाली : शोएब व माझी मुले खेळाडू होतीलच कशावरून? डॉक्टरही बनू शकतात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी २०१० मध्ये लग्न केले. लग्नानंतरही सानिया भारताकडून खेळते, तर शोएब पाकिस्तानकडून. सानियाला अजून मूलबाळ झालेले नसले तरी भविष्यात त्यांना होणारी मुले भारताकडून खेळणार की पाकिस्तानकडून?’ हा भारत-पाकिस्तानातील दोघांच्याही चाहत्यांच्या मनात कायम घोळणारा प्रश्न. हाच प्रश्न सानियाला एका टीव्ही शोमध्ये विचारण्यात आला.
चित्रपट अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि सानिया चांगल्या मैत्रिणी आहेत. ‘ याराें की बारात’ या शोमध्ये दोघी एकत्र आल्या होत्या. याच शोमध्ये चित्रपट दिग्दर्शक साजेद खान यांनी सानियाला हाच प्रश्न थेट विचारला,‘मी तुला भारत अाणि पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाकडून एक प्रश्न विचारू इच्छितो.
तुमच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत आणि तुम्हाला मूलबाळही होईल. तुमच्या बाळाला खेळाडू बनायचे असेल तर तो कोणत्या देशाकडून खेळेल ? भारताकडून की पाकिस्तानकडून ?..’ या अवघड प्रश्नाला सानियाने टेनिस कोर्टवरील मजबूत रिटर्नप्रमाणे उत्तर दिले.
सानिया म्हणाली, ‘खरे सांगते. आमच्या दोघांत याबाबत कधीच चर्चा झाली नाही. माहीत नाही. असेही शक्य आहे की तो खेळाडू बनणार नाही. तो किंवा तिला अॅक्टर, शिक्षक, डॉक्टर बनण्याची इच्छा असेल तर...? मात्र, हा विचार खूप दूरचा आहे.
मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि शोएबला पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे. मात्र, सध्या तरी आम्हाला पती-पत्नी असल्याचा अभिमान आहे.’ सानियाच्या या हजरजबाबी उत्तरापुढे साजेद खानही गप्प झाले. काही दिवसांपूर्वी टि्वटर सानिया आणि संजय मांजरेकर यांच्यात वाद झाला होता. त्या वेळीसुद्धा सानियाने मांजरेकरला जोरदार उत्तर देऊन गप्प केले होते.
बातम्या आणखी आहेत...