आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guangzhou Open Tennis: Saniya Mieza An Hingis In Final

सानिया मिर्झा-हिंगीस फायनलमध्ये दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वांगझू- जगातील नंबर वन सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस आता आठवडाभरात दुसरा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ही अव्वल मानांकित जोडी विजेतेपदापासून अवघ्या एका पावलावर आहे. सानिया आणि हिंगीसने शुक्रवारी ग्वांगझु ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.
या जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत इस्रायलची ज्युलिया ग्लुस्को आणि स्वीडनच्या रोबेस्का पीटरसनचा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने लढतीत ६-३, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. त्यांनी अवघ्या ७२ मिनिटांत सामना जिंकून फायनल गाठली.

सानिया आणि मार्टिना हिंगीसने नुकताच अमेरिकन ओपनमध्ये महिला दुहेरीचा किताब पटकावला. त्यामुळे आता आठवड्याच्या अंतरात या जोडीला दुसरे अजिंक्यपद अापल्या नावे करण्याची संधी आहे. या जोडीने सलगच्या विजयाची आपली मोहीम अबाधित ठेवताना हे यश संपादन केले.
जांकोविक अंतिम फेरीत
जगातील माजी नंबर वन जेलेना जांकोविकने महिला एकेरीची फायनल गाठली. तिने एकेरीच्या उपांत्य लढतीत विकमेयरचा पराभव केला. सर्बियाच्या जांकाेविकने रंगतदार लढतीत ६-३, २-६, ७-५ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. यासह तिने अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. यासाठी तिला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. विकमेयरने दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली हाेती. मात्र, त्यानंतर तिसऱ्या अाणि निर्णायक सेटमध्ये सर्बियाच्या जांकोविकने बाजी मारली.