हैदराबाद- वाहतूकीचा नियम तोडल्याप्रकरणी टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला वाहतूक पोलिसांनी दोनशे रूपये दंड ठोठावला आहे. हैदराबाद पोलिसांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सानियाच्या कारची नंबर प्लेट चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली होती. वाहतूकीच्या नियमानुसार नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात वाहनांच्या तपासणीची मोहिम सुरू होती. यावेळी वाहतूक पोलिसांनी सानियाची गाडी अडवली.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, चलानची कॉपी आणि संबंधित फोटो..