आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच आेपन टेनिस स्पर्धा : युकी, साेमू बाहेर; सानियावर नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - येत्या रविवारपासून सत्रातील ग्रँडस्लॅम फ्रेंच आेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची नजर जगातील नंबर वन सानिया मिर्झा आणि राेहन बाेपन्नावर असेल. स्पर्धेच्या मुख्य फेरीत हे दाेन्ही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारताच्या तिन्ही युवा खेळाडूंना पात्रता फेरीत आपले आव्हान कायम ठेवता आले नाही. त्यामुळे युकी भांबरी, साेमदेव देववर्मन आणि रामकुमार या तिघांनाही मुख्य फेरीत प्रवेश करता आला नाही. यासह या तिघांचेही स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले.

आता सानिया मिर्झा महिला दुहेरीत मार्टिना हिंगीससाेबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या जाेडीला यंदाच्या स्पर्धेत महिला दुहेरीच्या किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

युकीची झंुज अपयशी : जागतिक क्रमवारीत १५८ व्या स्थानावर असलेल्या युकी भांबरीने शुक्रवारी क्वालिफायरच्या दुसर्‍या फेरीत विजयासाठी दिलेली झंुज अपयशी ठरली. त्याला दुसर्‍या फेरीत जर्मनीच्या टीम पुएत्जने सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. जर्मनीच्या खेळाडूने ६-४, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने तिसरी फेरी गाठली. मात्र, पराभवासह युकीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

डाेनाल्डसनची रामकुमारवर मात
पुरुष एकेरीच्या दुसर्‍या पात्रता फेरीतील सामन्यात भारताच्या रामकुमारने निराशा केली. त्याला अमेरिकेच्या जारेड डाेनाल्डसनने पराभूत केले.
बातम्या आणखी आहेत...