आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ एकच फुप्फुस अन् डोंगराएवढी जिद्द; सँटियागो लँग नाकराने रिअाेमध्ये जिंकले सुवर्णपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिओ ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात प्रत्येक पदक विजेता आपापली पदके मिरवत नाचत होता. त्या सर्वांमध्ये एक असाही सुवर्णपदक विजेता होता, ज्याच्या सुवर्णपदकाची झळाळी आणखी तेजोमय होती.

त्याच्या कर्तृत्वापुढे नियतीलाही नमते घ्यावे लागले होते. त्याचे सातवे ऑलिम्पिक होते. वय होते ५४ वर्षे. वर्षभरापूर्वीच फुप्फुसाच्या कर्करोगातून बाहेर पडला होता. एक फुप्फुस काढून टाकण्यात आले होते. मात्र त्या शस्त्रक्रियेमुळे त्याची जिद्द मात्र कमी होण्याऐवजी वाढली होती. या लढवायचे नाव आहे अर्जेंटिनाच्या सँटियागो लँग नाकरा. बार्सिलोनात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. दिवसांनंतर तो सायकलिंग करत होता आणि महिनाभरातच तो पुन्हा ‘सेलिंग’चा सराव करायला लागला होता. आधीच्या अॉलिम्पिक स्पर्धांमधील सहभाग त्याला रिओ ऑलिम्पिकमधील सहभागासाठी सतत प्रवृत्त करत होता. लॅटिन अमेरिकेतील पहिल्यावहिल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याला काहीतरी वेगळे करायचे होते.

त्या ध्येयापासून कर्करोगही त्याला रोखू शकला नाही. एक फुप्फुस काढण्यात आल्यानंतरही त्याचा निश्चय ढळला नाही. अथेन्स बीजिंगमध्ये त्याने कांस्यपदके जिंकली होती. पण सुवर्णपदकाची आस कायम होती. रिओ ऑलिम्पिकमध्येच त्याची ती इच्छा पूर्ण झाली. अर्जेंटिनाच्या सँटियागो लँग नाकरा १७ मिक्सच्या सिसिला सरोली या युवतीसह सुवर्णपदक विजेता ठरला. ५४ वर्षीय सँटियागोची ऑलिम्पिक तपश्चर्या अखेर फळाला आली. यागो क्लाऊस ही त्याची दोन मुलेही सेलिंगमध्ये उतरली होती.

कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली. तो म्हणत होता, एका मुलीसोबत जोडीचा सहभाग मला ऑलिम्पिक सुवर्णपदक देईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

कर्कराेग पीडितांना स्फूर्ती
‘माझा विजय, यश माझ्याप्रमाणे कर्करोगाने पीडित अनेकांना स्फूर्तिदायी ठरेल. सेलिंगनेच मला ही जिद्द, स्फूर्ती, शक्ती दिली. या खेळातच तुम्ही सतत कठीण क्षणांचे अनुभव भोगलेले असतात. त्या कठोर प्रसंगांतून जीवनात मार्ग काढायला, उभे राहायला, पुढे जायला हा खेळच शिकवतो. माझे कुटुंब, माझा देश पाठीशी उभा राहिला, असेही सँटियागो म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...