आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिफा अध्यक्षपद निवडणूक : सॅप ब्लॅटर पाचव्यांदा अध्यक्षपदासाठी रिंगणात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - सामन्यातील तब्बल ९६० काेटींच्या घाेटाळ्यामुळे सध्या फुटबाॅल विश्वाची प्रतिष्ठा धुळीत मिळाली अाहे. यातूनच हाेत असलेल्या अाराेप-प्रत्याराेपांमुळे सध्या फिफाची लक्तरेही वेशीवर टांगली जात अाहेत. मात्र, अशाही परिस्थितीत सध्या सॅप ब्लॅटर हे फुटबाॅलच्या जगातील सर्वाेच्च महासंघाच्या फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान हाेण्यासाठी उत्सुक अाहेत. ते अाता पाचव्यांदा अध्यक्षपदाचे सिंहासन काबीज करण्यासाठी प्रयत्नशील अाहेत. लवकरच फिफाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक हाेणार अाहे. मात्र, सध्या या निवडणुकीत अनेक अडचणी निर्माण हाेत अाहेत.

गत १७ वर्षांच्या टीकेला काेणत्याही प्रकारची भीक न घालता ब्लॅटर यांनी फिफा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अाहे. या वेळी हाेत असलेल्या प्रचंड विराेधाला न जुमानता ते अापल्या भूमिकेवर ठाम अाहेत. ‘अागामी काही दिवस हे फिफासाठी फार कठीण अाहेत. विश्वास ठेवा, या कठीण काळातही फिफाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा माझ्या प्रयत्न असेल. त्यासाठी याेग्य प्रकारे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली जाईल,’ अशी प्रतिक्रिया ब्लॅटर यांनी दिली. तसेच अापण फुटबाॅल विश्वाला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून देऊ, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

ब्लॅटर यांचा मार्ग खडतर
सध्या ब्लॅटर यांना राेखण्यासाठी विराेधकांनीदेखील कंबर कसली अाहे. त्यामुळे ब्लॅटर यांच्यासाठी अागामी निवडणूक ही फार अाव्हानात्मक असण्याची शक्यता अाहे. कारण इंग्लंड, जर्मनी, स्विस अाणि फ्रान्सच्या फुटबाॅल महासंघाने ब्लॅटर यांना राेखण्यासाठी जाेरदार हालचाली सुरू केल्या अाहेत.

अमेरिका महासंघ ब्लॅटरविरुद्ध मैदानात
अार्थिक गैरव्यवहारांमुळे सध्या फिफा अध्यक्ष सॅप ब्लॅटरच्या हकालपट्टीची जाेरदार मागणी केली जात अाहे. मात्र, तरीही ब्लॅटर यांनी पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली अाहे. मात्र, ब्लॅटर यांच्याविरुद्ध मतदान करण्याची माहिती अमेरिका फुटबाॅल महासंघाने दिली अाहे.
बातम्या आणखी आहेत...