आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

७९ व्या वर्षी अध्यक्षपदाची धुरा, ब्लॅटरने निवडणुकीत केला प्रिन्सचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - विराेधकांचा कुटिल डाव हाणून पाडत सॅप ब्लॅटर ७९ व्या वर्षी जगातील फुटबाॅलच्या सर्वाेच्च संघटना फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले. त्यांनी पाचव्यांदा फिफाचे हे सिंहासन काबीज करण्याचा भीम पराक्रम करून फुटबाॅलच्या विश्वातील अापली ‘हवा’ कायम ठेवली. ब्लॅटर यांना राेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या जाॅर्डनच्या प्रिन्स अली बिन अल हुसेनचा पराभव झाला.

फिफाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या ९६० काेटींच्या अार्थिक गैरव्यवहारानंतरही सॅप ब्लॅटर यांच्यावरील विश्वासाला काेणत्याही प्रकारचा तडा गेला नाही. या वेळी झालेल्या निवडणुकीत तब्बल २०९ देशांच्या प्रतिनिधींनी मताचा अधिकार बजावला.

१७ वर्षांपासून वर्चस्व
सॅप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदावरील १७ वर्षांपासूनचे वर्चस्व कायम ठेवले. त्यांनी १९९८ पासून (२००२, २००७, २०११)अाजतागत २०१५ मध्ये अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. गत ४९ वर्षांपासून ते कार्यकारिणीवर अाहेत. त्यांनी तांत्रिकी संचालक म्हणून कार्यकारिणीत प्रवेश करून महासचिवासह अध्यक्षपदापर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला.
बातम्या आणखी आहेत...