आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार, झाझरिया यांना राजीव गांधी क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हाॅकीचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण विजेता भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांना देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   

राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित या कार्यक्रमात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रीत कौरसह १७ खेळाडूंना अर्जुुन पुरस्कार प्रदान   करण्यात आला. पुजारा श्रीलंका दौऱ्यावर असल्याने तो पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित नव्हता.  पदकासह क्रीडा रत्न पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना ७.५ लाख रुपये राेख आणि प्रशस्तिपत्र, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना ५ लाख रुपये राेख आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले.  

पुरस्कार विजेते  
अर्जुन - चेतेश्वर पुजारा ( क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), वरुण सिंग भाटी (पॅराअॅथलिट), प्रशांती सिंग  (बास्केटबॉल), एस.एस.पी. चौरसिया (गोल्फ), ओनम बेमबेम देवी (फुटबॉल), साकेत मिनेनी (टेनिस), वीजे सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर (अॅथलेटिक्स), आरोकिया राजीव (अॅथलेटिक्स), एस.व्ही. सुनील (हॉकी), सत्यव्रत कादियान (कुस्ती), अँथोनी अमलराज (टेबल टेनिस), पी.एन. प्रकाश (नेमबाजी), जसवीर सिंग (कबड्डी), देवेंद्रो सिंग (बाॅक्सिंग), मरियपन्न थंगावेलू (पॅराअॅथलिट).

द्रोणाचार्य - स्व. डाॅ. रामकृष्णन गांधी  
(अॅथलेटिक्स). जीवनगौरव द्रोणाचार्य - बृजभूषण मोहंती (बॉक्सिंग), प.ए. रफेल (हॉकी), संजय चक्रवर्ती (नेमबाजी), रोशन लाल (कुस्ती). ध्यानचंद - भूपेंद्र सिंग (अॅथलेटिक्स), सय्यद शाहिद हकीम (फुटबॉल), समरई टेटे (हॉकी).
बातम्या आणखी आहेत...