आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एफआयएच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलसाठी हाॅकी टीमचे नेतृत्व सरदाराकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टार मिडफिल्डर सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हाॅकी संघ बेल्जियम येथील अागामी स्पर्धेत खेळणार अाहे. येत्या २० जूनपासून बेल्जियम येथे एफआयएच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलला प्रारंभ हाेणार अाहे. ही स्पर्धा २० जून ते ५ जुलैदरम्यान रंगणार अाहे.
या स्पर्धेसाठी मंगळवारी हाॅकी इंडियाने १८ सदस्यीय भारतीय संघाची घाेषणा केली. या वेळी अांतरराष्ट्रीय सामन्यातील भला माेठा अनुभव असलेल्या सरदाराकडे टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. तसेच स्टार गाेलरक्षक पी. अार. श्रीजेश हा संघाच्या उपकर्णधारपदाची भूमिका बजावणार अाहे.
या स्पर्धेत भारताचा सलामी सामना २० जून राेजी फ्रान्सशी हाेईल. या स्पर्धेत दहा अव्वल संघ सहभागी झाले अाहेत. या टीमची अ अाणि ब गटात विभागणी करण्यात आली.

युवराजला संधी
मुंबईच्या युवराज वाल्मीकीला अागामी एफअायएच्या सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली अाहे. या युवा खेळाडूची भारतीय संघात निवड केली. अाता त्याच्याकडून या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे.
बातम्या आणखी आहेत...