आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदाराकडे संघाचे नेतृत्व, येत्या २७ जूनपासून सहा देशांची हाॅकी स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या २७ जूनपासून स्पेनमधील व्हॅलेंसियात सहा देशांच्या निमंत्रित हाॅकी स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेसाठी साेमवारी हाॅकी इंडियाने १८ सदस्यीय भारतीय संघाची घाेषणा केली. यासाठी अनुभवी खेळाडू सरदारा सिंगकडे भारतीय हाॅकी टीमचे नेतृत्व साेपवण्यात अाले. या स्पर्धेत भारतीय संघाचा सलामी सामना जर्मनीशी हाेईल.

नुकतेच भारतीय संघाने लंडन येथे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये एेतिसहासिक कामगिरी करताना राैप्यपदक पटकावले. त्यामुळे हाॅकी टीमचा अात्मविश्वास बुलंदीवर अाहे. हीच लय कायम ठेवत निमंत्रित हाॅकी स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. सरदारा संघात आल्याने मजबुती वाढेल.
बातम्या आणखी आहेत...