आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sardar Will Lead Indian Team In World Hockey League

हाॅकी लीग फायनलसाठी सरदाराकडे नेतृत्व, २७ नाेव्हेंबरपासून सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - येत्या २७ नाेव्हेंबरपासून अाठव्या वर्ल्ड लीग हाॅकी फायनलला प्रारंभ हाेत अाहे. या स्पर्धेत अाशियाई चॅम्पियन भारतीय संघ नशीब अाजमावणार अाहे. हाॅकी इंडियाने या स्पर्धेसाठी बुधवारी १८ सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घाेषणा केली. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर अापले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार अाहे. यासाठी भारताचे युवा खेळाडू सज्ज झाले अाहेत. ही स्पर्धा २७ नाेव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान रायपूरच्या मैदानावर रंगणार अाहे. यात अाठ संघ सहभागी हाेणार अाहेत.

सुनील, अाकाशवर मदार
भारतीय संघाच्या अाक्रमणाची मदार ही रमणदीप सिंग, एस.व्ही. सुनील, अाकाशदीप, ललित उपाध्याय यांच्यावर असेल. या वेळी तलविंदरकडूनही अाशा अाहे. त्यामुळे यजमान भारतीय संघाचे पारडे जड मानले जात अाहे.

युवीला विश्रांती, देविंदर संघात
मुंबईचा युवा खेळाडू युवराज वाल्मीकीला या वर्ल्ड लीग फायनलसाठी विश्रांती देण्यात अाली. त्यामुळे एकाच वेळी फायनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे या वाल्मीकी बंधंूचे स्वप्न भंगले. मात्र, त्याचा भाऊ देविंदर वाल्मीकीला संघामध्ये स्थान मिळाले अाहे.

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका
वर्ल्ड लीग फायनलच्या तयारीसाठी भारतीय संघ कसून सरावाला लागला अाहे. यासाठी अाता बलाढ्य अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन हाॅकी सामन्यांच्या मालिकेचे अायाेजन करण्यात अाले. येत्या १९ नाेव्हेंबरपासून या मालिकेला प्रारंभ हाेईल. यातील तीन सामने १९, २२ अाणि २३ नाेव्हेंबर राेजी अायाेजित केले अाहेत.

भारतीय संघ
गाेलरक्षक : श्रीजेश (उपकर्णधार), हरजाेत सिंग. डिफेंडर : वीरेंद्र लाक्रा, काेथजित, रघुनाथ, जसजित, रूपिंदरपाल सिंग, मिडफिल्डर : सरदारा सिंग (कर्णधार), चंदिलसेना सिंग, देविंदर वाल्मीकी, मनप्रीत सिंग, धर्मवीर सिंग, दानिश मुज्तबा, फाॅरवर्ड : एस.व्ही. सुनील, रमणदीप सिंग, अाकाशदीप सिंग, ललित उपाध्याय, तलविंदर सिंग.