आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकीपटूही असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने ठाेकले विक्रमी द्विशतक! भारताची दुसरी फलंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रिकेटच्या विश्वात अाता तुफानी खेळीमुळे नवनवीन विक्रम घडत असतात. यंदा महिलांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अवघ्या १६ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने (नाबाद २०२)शानदार द्विशतकी खेळी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील आणि महाराष्ट्रातील दुसरी फलंदाज ठरली आहे. हाॅकीपटूही असलेल्या जेमीमने १६३ चेंडूंत नाबाद २०२ धावा काढल्या.  मुंबई सौराष्ट्रावर २८५ धावांनी मोठा विजय मिळवला.
 
एडीसीए मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत २ बाद ३४७ धावा उभारल्या. यात सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्जने १६३ चेंडूंचा सामना करताना नाबाद २०२ धावांची खेळी केली. या खेळीत तिने २१ चौकार लगावले. सेजल रावतचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. तिने ११४ चेंडूंत २ चौकार खेचत ९८ धावा काढल्या. पूजा यादव १३ धावांवर बाद झाली. सौराष्ट्राकडून हिरल राठोडने एकमेव बळी घेतला. प्रत्युत्तरात सौराष्ट्राचा डाव ३९.४ षटकांत ६२ धावांत संपुष्टात आला. यात सलामीवीर मेघना जामबुचाने ५५ चेंडूंत एका चौकारासह सर्वाधिक २५ धावा काढल्या. मुंबईच्या सायली सातघरेने २२० धावांत ३ आणि जान्हवी काटेने १९ धावा देत २ फलंदाज टिपले. फातिमा जफरने २ विकेट घेतल्या.   
 
 
१९ वर्षांखालील गटात द्विशतकी ठोकणारी भारतातील दुसरी
जेमीमा १९ वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी भारतातील दुसरी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१३ मध्ये बडोदा येथे झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने गुजरात विरुद्ध १५० चेंडूंत २२४ धावा करत पहिले द्विशतक आपल्या नावे करण्याचा मान मिळवला. यंदा सत्रात जेमिमाने गुजरात विरुद्ध १४२ चेंडूंत १८७ धावांची तुफानी खेळी केली होती.  
 
जेमिमा पहिले गोलंदाज आता फलंदाज, हॉकीपटूही 
जेमिमाने क्रिकेटची सुरुवात गोलंदाज म्हणून सुरू केली.  काही वर्षांत  कामगिरीत बदल करत उत्कृष्ट फलंदाज म्हणून पुढे आणले. डावखुरी फलंदाज जेमिमाने गेल्या १० सामन्यांत ७०० धावा ठोकल्या आहेत. तिची सरासरी ३०० पेक्षा अधिक आहे. ती तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज आहे. विशेष म्हणजे जेमिमा हॉकीपटूदेखील आहे. तिने १७ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.   
 
संक्षिप्त धावफलक 
मुंबई  महिला संघ २ बाद ३४७ धावा. जेमीम २०२*, सेजल रावत ९८ धावा. हिरल राठोड ६१/१. सौराष्ट्र महिला संघ सर्वबाद ६२ धावा. मेघना जामबुच २५ धावा. सायली सातघरे २०/३, जान्हवी १९/२.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...