आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवालची शानदार सुरुवात; कश्यपचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- भारताचीनंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने विश्व बॅडमिंटन स्पर्धेत शानदार सुरुवात केली. बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सायनाने दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्या चेऊंग न्गानला २१-१३, २१-९ ने हरवले. यािशवाय किंदांबी श्रीकांत अन् एच. एस. प्रणयने दणकेबाज खेळाच्या आधारे सहज विजय मिळवून आगेकूच केली. मात्र उमेदीच्या परूपल्ली कश्यपला धक्कादायक पराभव सहन करावा लागला.
सायनाने अवघ्या ३४ मिनिटांत सामना जिंकून प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. अाता तिचा सामना जपानची चौथी मानांकित सयाका तकाहाशी हिच्याशी होईल. पुरुष गटात श्रीकांतने चायनीज तैपेईच्या सू जेन हाओचा २१-१४, २१-१५ ने पाडाव केला, तर विश्व क्रमवारीत १२ व्या स्थानावरील प्रणयने युगांडाच्या एडविन एकिरिंगचे आव्हान २१-१४, २१-१९ ने मोडीत काढले.
उपउपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या सिडेड श्रीकांतला १३ व्या सिडेड हाँगकाँगच्या हू यूनविरुद्ध झुंजावे लागेल. राष्ट्रकुल बॅडमिंटन विजेत्या १० व्या सीडेड कश्यपला या सामन्यात सूरच गवसला नाही. त्यामुळे त्याला व्हिएतनामच्या ३२ वर्षीय तिएन मिन्ह गुयेनने सामन्यात २१-१७, १३-२१, १८-२१ ने अपयश सहन करावे लागले. महिला दुहेरीतील भारतीय जाेडी प्रज्ञा गद्रे-सिक्की रेड्डीला जपानी जोडी शिझुका मातसुओ-मामी नाईतो यांच्याकडून हरल्या.
सामन्यादरम्यान रिटर्नचा फटका मारताना सायना नेहवाल.

ज्वाला-अश्विनीची विजयी दौड
२०११च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणारी भारताची १३ वी सीडेड महिला दुहेरीतील स्टार जोडी ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पाने फाॅर्म कायम राखताना चायनीज तायपेईच्या सुएह पेई चेन-वु ती जुंग या जोडीला २१-१०, २१-१८ असे सहज नमवले. उप-उपांत्यपूर्व फेरीत ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक िवजेत्या भारतीय जोडीला जपानच्या रेईका काकिवा-मियुकी माएडा या जोडीशी झंुजावे लागेल.