आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

74 मिनिटांची झुंज अपयशी; सायनाचे कांस्यवर समाधान, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगाे - माजी नंबर वन अाणि अाॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालचा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्यांदा राैप्यपदक निश्चित करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यासाठी तिने दिलेली झुंज अपयशी ठरली. तिला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे तिला महिला एकेरीमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १२ व्या मानांकित सायनाने गत २०१५ च्या जकार्ता येथील जागतिक स्पर्धेत राैप्यपदक पटकावले हाेते. अाता सलग दुसऱ्यांदा या राैप्य वा सुवर्णपदक जिंकण्याचा तिचा प्रयत्न हाेता. मात्र, यासाठी तिने केलेला प्रयत्न अपुरा ठरला.  

सातव्या मानांकित नाेझाेमी अाेकुहाराने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या सायनाला पराभूत केले. तिने १२-२१, २१-१७, २१-१० अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासह जपानच्या खेळाडूने एकेरीच्या फायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला.   
 
सायनाची ७४ मिनिटे झुंज : गतवेळच्या राैप्यपदक विजेत्या सायनाने फायनलमधील प्रवेशासाठी ७४ मिनिटे शर्थीची झुंज दिली. मात्र, तिला विजयश्री खेचून अाणता अाली नाही. तिने लढतीमध्ये अाेकुहाराविरुद्ध दमदार सुरुवात केली. तिने सहज पहिला गेम जिंकला. यामुळे तिला अाघाडी मिळाली. मात्र, त्यानंतर सातव्या मानांकित अाेकुहाराने सामन्याला कलाटणी दिली. तिने दुसरा गेम जिंकून लढतीमध्ये बराेबरी साधली. त्यानंतर सायनाचा तिसरा अाणि निर्णायक गेम जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. यामुळे तिला सामना गमवावा लागला.   
 
भारताचे चाैथे पदक
भारताचे हे या स्पर्धेतील चाैथे पदक ठरले. यामध्ये तीन कांस्य अाणि एका राैप्यपदकाचा समावेश अाहे. सिंधूने भारतीय संघाला २०१३ अाणि २०१४ मध्ये कांस्यपदक मिळवून दिले हाेते. त्यानंतर २०१५ मध्ये सायनाने भारतासाठी राैप्यपदक जिंकले. त्यानंतर अाता तिने भारतीय संघाच्या नावे कांस्यपदकाची नाेंद केली.
 
सायनाचे स्पर्धेतील दुसरे पदक
भारताच्या सायना नेहवालने जागतिक स्पर्धेत दुसऱ्या पदकाची अापल्या नावे नाेंद केली. तिने यापूर्वी २०१५ मध्ये जकार्ता येथील जागतिक स्पर्धेत राैप्यपदक पटकावले हाेते. अाता तिला २०१७ मध्ये ग्लासगाे येथील स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले अाहे.  या वेळी साेनेरी यश संपादन करण्याचा तिचा मानस हाेता. यासाठीची तिने तयारी कसून केली हाेती. मात्र, ती अपयशी ठरली.
 
 
बातम्या आणखी आहेत...