आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, पी. व्ही. सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहआलम (मलेशिया)- भारताची नंबर वन महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी शानदार प्रदर्शन करताना मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दोघींनी गुरुवारी महिला एकेरीचे आपापले सामने जिंकून ५५०००० अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धेत पुढची फेरी गाठली.

पी. व्ही. सिंधूने शानदार प्रदर्शन करताना कोरियाच्या सुंग जी ह्युएनला २२-२०, २१-१७ ने नमवले. सिंधूने ही लढत अवघ्या ४७ मिनिटांत जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला हैदराबादेत झालेल्या एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुंग जीने हरवले होते. मात्र, या वेळी सिंधूने मागच्या पराभवाचा वचपा काढताना विजय मिळवला. सुंग जी आणि सिंधू यांच्यात विजय-पराभवाचे गणित आता ५-३ असे झाले आहे. आता २० वर्षीय हैदराबादच्या सिंधूला पुढच्या सामन्यात दोन वेळा इंडियन ओपन जिंकणाऱ्या थायलंडच्या रत्नाचोक इंतिनोन हिच्याशी लढायचे आहे.

सिंधूच्या विजयानंतर सायनाने आपला फॉर्म कायम ठेवताना कोरियाच्याच बे युन जूला २१-१०, २१-१६ ने पराभूत केले. सायनाने हा सामना अवघ्या अर्ध्या तासात आपल्या नावे केला. सायनाने या कोरियाच्या खेळाडूविरुद्ध आतापर्यंत १३ सामन्यांत नववा विजय मिळवून अापली दादागिरी सिद्ध केली. सायनाने या लढतीत दमदार प्रदर्शन केले. तिच्या आक्रमक खेळाने विराेधीला नामोहरम केले.

श्रीकांत टाॅप-१० मधून बाहेर; सिंधूची प्रगती
पराभवाच्यागर्तेत सापडलेल्या के. श्रीकांत अाणि सायना नेहवालला जागतिक क्रमवारीत फटका बसला. श्रीकांतला पुरुष एकेरीच्या टाॅप-१० मधून बाहेर पडावे लागले. तसेच सायनाची महिला एकेरीत अाठव्या स्थानावर घसरण झाली. मात्र, दुसरीकडे सिंधूने क्रमवारीत प्रगती साधली. तिने महिला एकेरीच्या टाॅप-१० मध्ये धडक मारली. तिने क्रमवारीत दहावे स्थान गाठले. के. श्रीकांतची १४ व्या स्थानावर घसरण झाली. सायना नेहवाल सहावरून अाठव्या स्थानावर घसरली आहे. तिचे दोन स्थानांचे नुकसान झाले.