आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Search Meritorious Players Promotion Foundation; The Sports Sector Career And Education

प्रमोशन फाउंडेशनचा गुणवंत खेळाडूंचा शोध; शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही करिअर करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्यासाठी गुणवंत खेळाडूंचा शोध राष्ट्रीय पातळीवरील ‘स्कूल स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन’ घेत आहे. क्रिकेट व फुटबॉलनंतर यंदाच्या वर्षी व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व अॅथलेटिक्स या तीन खेळांचा समावेश फाउंडेशनने केला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत तळावर असलेल्या भारताला पदक मिळविण्यासाठी शासन काय करते, काय करायला पाहिजे? हा प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण काही तरी केले पाहिजे या संकल्पनेतून या फाउंडेशनची स्थापना २०१५-१६ मध्ये झाली. १० ते १५ वयोगटातील गुणवंत खेळाडूंचा शोध घेणे. त्यांना प्रशिक्षणाबरोबरच दर्जेदार शिक्षणही देणे हा या फाउंडेशनचा प्रमुख उद्देश आहे.
यासाठी फाउंडेशनला स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. हिरा बल्लाह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील क्रीडा संचालकामार्फत हा उपक्रम देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत त्यांनी पोहोचविला आहे.

एका खेळाडूंवर १० लाख खर्च
गुणवंत खेळाडू शोधण्यासाठी १० ते १५ वयोगटातून शालेय पातळीवर जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेऊन त्यातून एक संघ निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी प्रत्येक खेळाडूंमागे १० लाख रुपये खर्च फाउंडेशन करते.

तज्ज्ञ मार्गदर्शक
क्रिकेटसाठी चेतन शर्मा, फुटबॉलसाठी भाईचुंग भुतिया, बास्केटबॉलसाठी हनुमानसिंग, व्हॉलीबॉलसाठी ओमप्रकाश, अॅथलेटिक्ससाठी गुरबचनसिंग रंधवा, शूटिंगसाठी गगन नारंग हे फाउंडेशनचे मार्गदर्शक आहेत.
१७ जानेवारीपर्यंत नोंदणी
स्पर्धेत भाग घेण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत शाळांनी आपली नोंदणी फाउंडेशनच्या www.sspf.in या संकेतस्थळावर करावी. तपशीलवार माहिती संकेतस्थळावर आहे.
पुढील वर्षी शूटिंग व धनुर्विद्या
- संस्थापक अध्यक्ष ओम पाठक यांच्या संकल्पनेतून क्रिकेट व फुटबॉलमध्ये २१ राज्यांतून १२०० शाळांतील २३ हजार विद्यार्थ्यांना फाउंडेशनने सामावून घेतले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यंदा तीन खेळांचा समावेश झाला. पुढील वर्षी शूटिंग व धनुर्विद्याचा समावेश करण्याचा मानस आहे.
- राजारमण, फाउंडेशनचे प्रसिद्धी संचालक
बातम्या आणखी आहेत...