आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपा, ललिताच्या नावे विशेष रेल्वे धावावी; सेहवागची पंतप्रधान, रेल्वमंत्र्यांकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने देशवासीयांचे हृदय जिंकणारी महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व महिला धावपटू ललिता बाबरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दीपा महिला व्हॉल्टच्या अंतिम स्पर्धेत पदकाजवळ पोहोचत चौथ्या क्रमांकावर राहिली. यानंतर जिम्नॅस्टिक सारख्या क्रीडाप्रकारात दीपाने भारताचा जागतिक स्तरावर गौरव केल्याची भावना व्यक्त झाली. महिला धावपटू ललिता बाबर जवळपास तीन दशकांनंतर ३ हजार स्टीपलचेस धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला ठरली होती. ललिताआधी पी.टी. उषानेही या इव्हेंटमध्ये भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. ललिता बाबर या स्पर्धेत दहाव्या क्रमांकावर राहिली होती. या दोन महिलांच्या नावे देशात विशेष रेल्वे किंवा विमानसेवा सुरू करण्याची मागणी माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
बातम्या आणखी आहेत...