आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये? सेरेनाबाबत एका अमेरिकन वृत्तपत्राने दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क - ‘क्वीन अाॅफ टेनिस’ सेरेना विल्यम्स मागील काही वर्षांपासून टेनिसच्या विश्वात अधिराज्य गाजवत अाहे. अाता लवकरच ती दुसऱ्या खेळामध्येही अापले नशीब अाजमावण्यास उत्सुक अाहे. सेरेना अाता डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खेळताना दिसणार असल्याची माहिती अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने दिली. मात्र, अद्याप सेरेना अाणि डब्ल्यूडब्ल्यूई यांच्याकडून या वृत्ताला काेणत्याही प्रकारचा दुजाेरा मिळाला नाही. यावर त्यांनी काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही अाणि या वृत्ताचे खंडनही केले नसल्याचे दिसते.   
 
द माॅर्निंग न्यूज यूएसएने दिलेल्या माहितीनुसार सेरेना अाता रेसलमेनिया ३३ मध्ये सहभागी हाेऊ शकते. २३ वा ग्रँडस्लॅम किताब विजेती सेरेना २ एप्रिल राेजी फ्लाेरिडामध्ये अमेरिकेच्या प्राेफेशनल मल्ल चार्लाेट फ्लेयरसाेबत झुंज देऊ शकते. चार्लाेट ही डब्ल्यूडब्ल्यूईमधील दिग्गज रिक फ्लेयरची मुलगी अाहे. चार्लाेटने यात २०१३ मध्ये पदार्पण केले.   सेरेनाच्या भावी पती एलेक्सिस अाेहेनियनने डब्ल्यूडब्ल्यूईच्या बेल्टचा फाेटाे साेशल मीडियावर पाेस्ट केला. त्यानंतर या चर्चेला उधाण अाले आहे.
बातम्या आणखी आहेत...