आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राॅजर्स चषक : उपांत्य लढतीत युवा खेळाडू बेलिंडाकडून सेरेना पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेरंटाे - स्विसच्या बेलिंडा बेनसिकने सनसनाटी विजयासह राॅजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. तिने महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सचा पराभव केला. बेलिंडाने ३-६, ७-५, ६-४ ने विजय मिळवला. यासह तिने एकेरीच्या किताबावरचा दावा मजबूत केला. दुसरीकडे पराभवासह सेरेनाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
याशिवाय अमेरिकन अाेपनची तयारी करणाऱ्या सेरेनाला अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. तिने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. मात्र, तिला दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये अाव्हान कायम ठेवता अाले नाही. याचाच फायदा घेत बेलिंडाने सामना जिंकला. अाता
बेलिंडासमाेर फायनलमध्ये सिमाेना हालेपचे अाव्हान असेल.

सानिया-मार्टिनाचे अाव्हान संपुष्टात
जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगिस या जाेडीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. कॅराेलिन गार्सिया आणि कॅटरिना सरेबाेटनिकने महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत सानिया-मार्टिनाचा पराभव केला. त्यांनी ६-३, ६-२ ने विजय मिळवला. यासाठी या जाेडीला ५९ मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली. पराभवासह अव्वल मानांकित सानिया-मार्टिनाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.