आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाला कन्यारत्न; 2034 च्या विम्बल्डन चॅम्पियन’चे अागमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लाेरिडा-टेनिसच्या विश्वातील अव्वल खेळाडू सेरेना विल्यम्सला शनिवारी कन्यारत्न झाले. अमेरिकेच्या या ३५ वर्षीय टेनिसस्टारने फ्लाेरिडाच्या वेस्ट पाम बीचमधील सेंट मेरी मेडिकल सेंटरमध्ये एका कन्येला जन्म दिला. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात अाला. यात नंबर वन राफेल नदालसह फेडरर, व्हीनसने खास शब्दात सेरेनाचे खास अभिनंदन केले. साेशल मीडियावरही  कन्येचे  जल्लाेषात स्वागत करण्यात अाले. जन्मलेल्या मुलीचे वजन ३.०९ किलाे अाहे.   
 

‘२०३४ च्या विम्बल्डन चॅम्पियनचे अागमन झाले’अशा शब्दांमध्ये काही चाहत्यांनी   प्रतिक्रिया देत सेरेनाला खास शुभेच्छा दिल्या. सेरेना ही अाता मुलीसाेबत दुहेरीचा सामना खेळू शकेल, असेही टि्वट चाहत्यांनी केले.
 
 
व्हीनसकडून खास अभिनंदन 
माजी नंबर वन अाणि सेरेनाची माेठी बहीण व्हीनसनेही खास शुभेच्छा दिल्या. ‘मावशी झाल्यामुळे मी अधिकच खुश अाहे. हा अानंद  शब्दांत व्यक्त करता येऊ शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया व्हीनसने दिली.
बातम्या आणखी आहेत...