जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर असणार्या टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने मोठ्या बहिण असलेल्या व्हिनस विल्यमचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक घेतली. तिने व्हिनसचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला.
या सामन्यात सेरेनाने व्हिनसला सरळ सेटमध्ये ६-२, १-६, ६-३ ने हरवले. सेरेनाने वर्षभरात फ्रेंच ओपन, मेलबर्न ओपन, विम्बल्डन आणि मियामी ओपनचे जेतेपद पटकवले आहेत. आता तिने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. त्यामुळे ती कॅलेंडर ग्रँडस्लॅमच्या केवळ दोन पावलेच दूर असल्याचे बोलले जात आहे.
आता उपांत्य फेरीत सेरेना विल्यम्सविरुद्ध इटलीच्या रॉबर्टा विन्सी यांच्यात रंगणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा रोमांच...