Home »Sports »Other Sports» Serena Williams Is Pregnant

सेरेना विलियम्स प्रेग्नंट, स्विम सूटमध्ये फोटो पोस्ट करत लिहले- 20 आठवडे

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 10:35 AM IST

  • टेनिस स्टार सेरेना विलियम्स (35) आई बनणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच दिली आहे.
न्यूयॉर्क- टेनिस स्टार सेरेना विलियम्स (35) आई बनणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच दिली आहे. सोशल मीडियातील एक फोटो पोस्ट करत लिहले की, '20 आठवडे'. या फोटोत तिने यलो कलरचा स्विम सूट घातला आहे. हे वृत्त मिडियात येताच लोकांनी तिला सोशल मीडियात शुभेच्छा देणे सुरु केले. द वुमन टेनिस असोसिएशनने सुद्धा सेरेनाला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत सेरेना एका मिररसमोर उभी आहे...
- एका न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, सेरेना विलियम्सच्या मीडिया प्रवक्त्याने या दुजोरा दिला आहे. त्याने हे ही म्हटले आहे की, मला आनंद झाला आहे की, सेरेना आता आई बनणार आहे.
- सेरेनीने हा फोटो स्नॅपचॅटवर पोस्ट केला. यात ती एका आरशासमोर उभी आहे. तसेच तिच्या हातात मोबाइल आहे आणि तिने यलो कलरचा स्विम सूट घातला आहे. त्याखाली कॅप्शन लिहले आहे- '20 आठवडे'.
- आपल्याला माहित असेलच की, डिसेंबर महिन्यातच रेड्डिटचा को-फाउंडर एलेक्सिस ओहानियनसोबत तिने साखरपुडा केला होता. ही माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती.
सेरेनाने पोस्ट केलेला फोटो डिलीट केला-
- सेरेनाने नंतर आपली पोस्ट डिलीट करून टाकली. यानंतर तिचे फॅन्स यांच्यात संभ्रमावस्थेत आहेत. लोक यावर चर्चा करत आहे की, काय सेरेना चेष्टा-मस्करी तर करत नाही.
186 आठवड्यापर्यंत नंबर वन राहण्याचा विक्रम-
- या वर्षी सेरेनाने विंबल्डनमध्ये आपल्या करियरमध्ये 71 वा सिंगल्‍स किताब जिंकला.
- यात 22 ग्रॅंड स्‍लॅम सिंगल्‍स किताब तिच्या नावावर आहेत. या विक्रमासोबतच तिने टेनिस प्लेयर स्‍टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी तिने केली आहे.
- तिच्या नावावर 186 आठवड्यापर्यंत ती जगातील नंबर वन खेळाडू राहिली आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सेरेनाने केलेले टि्वट...

Next Article

Recommended