आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्णभेदावर गप्प बसणे ही स्वत:शी दगाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस - जगातली दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सामाजिक अन्यायाविरुद्ध मी गप्प बसणार नाही, असे ती म्हणाली. २२ वेळेसची ग्रँडस्लॅम विजेती सेरेनाने कृष्णवर्णीय नागरिकांवर होत असलेले अत्याचार आणि वर्णभेदाविरुद्ध आपल्या फेसबुक पेजवर स्पष्टपणे विचार मांडले.

सेरेना म्हणाली, ‘मी माझ्या १८ वर्षीय भाच्यासोबत कारने जात असताना रस्त्याच्या बाजूला पोलिस अधिकाऱ्यांना बघून मी घाबरले. मी फोनवर काही काम करीत होते. म्हणून मी भाच्याला गाडी चालवण्यास सांगितले. मात्र, काही अंतरावर मी एका पोलिसाला पाहिले तेव्हा मी घाबरले आणि कारचा वेग बरोबर आहे का ते पाहिले. तेव्हा मला त्या महिलेचा घाबरवणारा व्हिडिओ आठवला. त्यात तिच्या प्रियकरावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. भाच्याला कार चालवण्यास सांगितल्यामुळे नंतर मला वाईट वाटले. त्याला काही झाले असते तर मी स्वत:ला कधीही माफ करू शकले नसते. तो खूप निरागस आहे. पोलिसांच्या वर्णभेदी भूमिकेमुळे ज्यांनी प्राण गमावले, ते लोक सुद्धा निरागसच होते. आम्ही खूप सहन केले नाही काय ? या वर्णभेदाने अनेकांचे जीवन प्रभावित केले नाही काय ?..याविरुद्ध आवाज बुलंद केला पाहिजे, अशी जाणीव मला झाली आहे. डॉ. मार्टिन ल्युथर किंग म्हणाले होते की, एक वेळ अशी येते जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा स्वत:शीच दगाबाजी करत असतो. आता मी गप्प बसणार नाही, हे मी ठरवले आहे. या वाईटपणाला संपवण्यासाठी आम्हाला आवाज बुलंद करावा लागेल.’
काही दिवसांपूर्वीच एनबीए स्टार ले ब्रोन जेम्सने आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे म्हटले होते.
गर्लफ्रेंड व ४ वर्षीय मुलीसमोर कृष्णवर्णीय युवकावर गोळी झाडली
या वर्षी ६ जुलै रोजी मिनेसोटा येथे ३२ वर्षीय कृष्णवर्णीय युवक फिलांदो कास्टाईलला एका पोलिसाने कारमधून बाहेर ओढून गोळी झाडून हत्या केली होती. त्या वेळी कारमध्ये फिलांदोची गर्लफ्रेंड डायंंड रोनोल्डस्, चारवर्षीय मुलगीसुद्धा हजर होती. रोनोल्ड्सने या घटनेचे चित्रीकरण केेले होते. या घटनेचा उल्लेख सेरेना विल्यम्सने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
बातम्या आणखी आहेत...