आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन : मरे, सेरेना विल्यम्स, राअाेनिक विजयी; अमेरिकेच्या इन्सरचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - दुसऱ्या मानांकित अँडी मरेसह सेेरेना अाणि कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकने सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील अागेकूच कायम ठेवली. या दाेघांनीही पुरुष एकेरीच्या चाैथ्या फेरीत धडक मारली.

इंग्लंडच्या मरेने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत विजय संपादन केला. त्याने अाॅस्ट्रेलियाच्या मिलीमनचा ६-३, ७-५, ६-२ ने पराभव केला.

दुसरीकडे महिला गटात नवव्या मानांकित केयासने चाैथ्या फेरीत प्रवेश केला. तिने फ्रान्सच्या कार्नेटचा पराभव केला. तिने ६-४, ५-७, ६-२ अशा ने सामना जिंकला. एंजेलिक केर्बरने तिसऱ्या फेरीत विथाेइफ्टवर ७-६, ६-१ ने मात केली. पेत्रा क्विताेवाला रशियाच्या मकाराेवाने ७-५, ७-६ ने हरवले. रदावांस्काने चेक गणराज्यच्या कॅटरिनावर ६-३, ६-१ ने मात केली.

त्साेंगाची इन्सरवर मात
फ्रान्सच्या ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाने मॅरेथाॅन लढतीत अमेरिकेच्या जाॅन इन्सरचा पराभव केला. त्याने ६-७, ३-६, ७-६, ६-२, १९-१७ ने सामना जिंकला. यासाठी त्याने ४ तास २४ मिनिटे झुंज दिली.

सेरेनाचे त्रिशतक
सेरेनाने ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत ३०० विजयाची नाेंद केली. तिने रविवारी विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या अनिका बेकचा पराभव केला. तिने ६-३, ६-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत प्रवेश निश्चित करता अाला.
बातम्या आणखी आहेत...