आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाची सप्तरंगी चमक, सातव्यांदा विम्बल्डन चॅम्पियन; केर्बरला ७-५, ६-३ ने हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने शनिवारी अवघ्या ८१ मिनिटांत स्पर्धेत महिला एकेरीचा किताब जिंकला. तिने अापल्या टेनिस करिअरमध्ये सातव्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद अापल्या नावे केले. तसेच तिने यंदाच्या सत्रात पहिल्या विजेतेपदावर नाव काेरले. याशिवाय तिला सत्रात माेठ्या स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडित करता अाली. यापूर्वी दाेन ग्रँडस्लॅम स्पर्धांत सेरेना अपयशी ठरली.

अव्वल मानांकित सेरेनाने महिला एकेरीच्या फायनलमध्ये अाॅस्ट्रेलियन अाेपन चॅम्पियन एंजेलिक केर्बरचा पराभव केला. तिने ७-५, ६-३ अशा फरकाने सरळ दाेन सेटमध्ये सहज एकतर्फी विजय साकारला. यासह तिला अवघ्या ८१ मिनिटांमध्ये किताबावर नाव काेरता अाले. दुसरीकडे पराभवामुळे जर्मनीच्या कर्बरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने अापल्या करिअरमध्ये प्रथमच या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला हाेता. केर्बरने गत जानेवारीमध्ये अाॅस्ट्रेलियन अाेपनच्या फायनलमध्ये सेरेनाला धूळ चारली हाेती.मात्र, अाता याच पराभवाची परतफेड सेरेनाने केली.

अमेरिकेच्या सेरेनाने अापल्या अाक्रमक खेळीच्या बळावर दमदार सुरुवात केली. मात्र, तिला पहिल्या सेटवर जर्मनीच्या खेळाडूने चांगलेच झुंजवले. त्यामुळे हा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला. मात्र, यात सरस खेळी करत अव्वल मानांकित सेरेनाने बाजी मारली अाणि लढतीत अाघाडी मिळवली. त्यानंतर तिने अापली लय कायम ठेवत दुसरा सेट सहज जिंकून केर्बरला बाहेरचा रस्ता दाखवला. तिने सामन्यात १३ एेस अाणि ३९ विनर्स मारून विजयश्री खेचून अाणली. त्यामानाने जर्मनीची खेळाडू काेर्टवर अापली फारशी चमक दाखवू शकली नाही. तिला १२ विनर्स मारता अाले. त्यामुळे तिचा जगातील नंबर वन सेरेनासमाेर निभाव लागला नाही.

पराभवाची परतफेड
अव्वल मानांकित सेरेनाने शनिवारी जर्मनीच्या केर्बरला अापली बहीण व्हीनसच्या पराभवाची परतफेड केली. शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात चाैथ्या मानांकित कर्बरने जगातील माजी नंबर वन व्हीनसचा पराभव केला हाेता. यासह तिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला हाेता.

स्टेफीशी बराेबरी
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने शनिवारी जगातील माजी नंबर वन स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बराेबरी साधली. जर्मनीच्या स्टेफी ग्राफने अापल्या टेनिस करिअरमध्ये एकेरीच्या २२ ग्रँडस्लॅम किताबावर नाव काेरले हाेते. यात विम्बल्डनच्या सात विजेतेपदांचा समावेश अाहे.

अँडी मरे- मिलाेस राअाेनिकची अाज फायनल
अाता एकेरीच्या किताबासाठी इंग्लंडचा मरे अाणि कॅनडाचा मिलाेस राअाेनिक यांच्यात रविवारी फायनल रंगणार अाहे. यजमान इंग्लंडच्या अँडी मरेने तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात टाॅमस बर्डिचचा पराभव केला. त्याने ६-३, ६-३, ६-३ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला.

२२ ग्रँडस्लॅम किताब
०६- अाॅस्ट्रेलियन अाेपन : २००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५
०३ - फ्रेंच अाेपन : २००२, २०१३, २०१५
०७ - विम्बल्डन : २००२, २००३, २००९, २०१०, २०१२, २०१५,२०१६
०६ - अमेरिकन अाेपन: १९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...