आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना सर्वात श्रीमंत, शारापाेवाची घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाॅस एंजलिस - तब्बल २१ ग्रँडस्लॅम विजेती अाणि नंबर वन टेनिसपटू सेरेना विल्यम्स अाता जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनली अाहे. नुकतीच फाेर्ब्स मॅगझिनने याची यादी जाहीर केला. यामध्ये अमेरिकेच्या सेरेनाने अव्वल स्थान गाठले. तिने रशियन टेनिसपटू अाणि सध्या डाेपिंगमुळे काेर्टपासून दूर असलेल्या मारिया शाराेपावाला पिछाडीवर टाकले. अाता शारापाेवा दुसऱ्या अाणि अमेरिकेची माॅर्शल अार्ट स्टार राेंडा राउसी तिसऱ्या स्थानावर अाहे.
फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेतील उपविजेत्या सेरेना विल्यम्सने यंदाच्या सत्रामध्ये सर्वाधिक २८.९ मिलियन डाॅलरची कमाई केली. यासह तिने जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूचा बहुमान पटकावला. यामध्ये तिने अनेक दिग्गजांनाही मागे टाकले अाहे. तिला फ्रेंच अाेपनमधील उपविजेतेपदासह ७ काेटींचे बक्षीस देऊन गाैरवण्यात अालेेे. तिने अापल्या करिअरमध्ये अातापर्यंत २१ ग्रँडस्लॅम जिंकले अाहेत. तिने ७७.६ मिलियन डाॅलरची कमाई
केली अाहे.
या यादीत अमेरिकेच्या राेंडा राउसीने तिसरे स्थान गाठले अाहे. तिची वर्षभरात १४ मिलियन डाॅलरची कमाई अाहे. तसेच नास्करचा स्टार कार ड्रायव्हर दानिका पॅट्रिकने श्रीमंताच्या यादीत चाैथ्या स्थानावर धडक मारली. त्याची कमाई १३.९ मिलियन
डाॅलरची अाहे.
११ वर्षे शारापाेवा अव्वल
रशियाची टेनिसपटू शारापाेवा ही गत ११ वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर हाेती. मात्र, मागील दाेन महिन्यांपूर्वी तिने डाेपिंगची घाेषणा केली. यातूनच तिच्या कमाईवर माेठा फटका बसला. अनेक कंपन्यांनी तिच्यासाेबतचे करारही संपुष्टात अाणले. तिची एकूण कमाई ही २१.९ मिलियन डाॅलर अाहे.
बातम्या आणखी आहेत...