आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी संघाच्या खेळाडूचे प्राण वाचवून ऑरियर बनला हीरो !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोऊके (आयव्हरी कोस्ट) - आयव्हरी कोस्ट आणि माली यांच्यात वर्ल्डकप फुटबॉल क्वालिफायरचा सामना सुरू होता. सामन्याच्या २० व्या मिनिटाला मालीचा खेळाडू मोउसा डोबिया फिट्स येऊन पडला. तो बेशुद्ध हाेऊन कोसळला. काय करावे, कोणाला काहीच समजत नव्हते. खेळाडू डॉक्टर येण्याची वाट बघत होते. इतक्यात मोउसा आपली जीभ गिळणार आहे, हे आयव्हरी कोस्टचा डिफेंडर सर्ज ऑरियरच्या लक्षात आले. असे झाले असते तर काही क्षणांतच तो मृत्युमुखी पडला असता. ऑरियरने लगेचच मोउसाच्या तोंडात हात टाकून त्याची जीभ बाहेर काढली. यानंतर त्याने छातीला दाबून पंप करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोउसा शुद्धीत आला आणि त्याचे प्राण वाचले. आपल्या या समजूतदारपणामुळे ऑरियर हीरो बनला.
सामना सुरू होण्यापूर्वी त्याची तुलना एक भांडखोर आणि सणकी खेळाडूंत होत होती. फ्रान्सचा क्लब पॅरिस सेंट जर्मनकडून फुटबॉल खेळणारा ऑरियरने याच वर्षी फेब्रुवारीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ जाहीर करून आपले कोच आणि सहकारी खेळाडूंना शिवीगाळ केली होती. यानंतर त्याला लगेचच निलंबित करण्यात आले होते. यामुळे तो चेस्लीविरुद्ध चॅम्पियन लीग सामन्यात खेळू शकला नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी ऑरियरने पॅरिस येथे एका पोलिस अधिकाऱ्याला कोपरा मारला होता. त्या वेळी त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवासही झाला. मात्र, अपील पेंडिंग झाल्यामुळे त्याला ही शिक्षा भोगावी लागली नाही. मालीविरुद्ध सामन्यात मोउसाचे प्राण वाचवल्यानंतर ऑरियर पुन्हा जुन्या रंगात आला होता. या घटनेच्या दहा मिनिटांनंतरच त्याच्या शॉटवर मालीच्या एका खेळाडूने आत्मघातकी गोल केला. गळा कापण्याची अॅक्शन करून ऑरियरने या गोलचा जल्लोष केला. यामुळे त्याच्यावर टीकासुद्धा झाली. त्याच्या सहकारी खेळाडूंच्या मते, ऑरियर आपल्या व्यवहाराने टगेखोर वाटत असला तरीही तो प्रत्यक्षात मृदू स्वभावाचा चांगला माणूस आहे. तो बऱ्याच वेळा बंडखोरासारखेही वागतो. त्याचा असा व्यवहार त्याची ओळख आहे. यात त्याने बदल करू नये, असेही मित्र म्हणतात. स्वत: ऑरियरने या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला.
आता ऑरियर पुन्हा चाहत्यांचा हिरो झाला असून तो विरोधी संघासाठीसुद्धा आवडता खेळाडू बनला आहे.
बातम्या आणखी आहेत...