आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA स्कॅंडल: धनाढ्य क्रीडा संस्थेतही \'हेराफेरी\', सात अधिकार्‍यांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः डावीकडून फीफाचे अधिकारी राफेल एस्क्यूवेल, निकोलस लेओज, जेफ्री वेब, जॅक वॉर्नर, एडवर्डो ली, ई फिगुरेडो आणि जोसे मारिया मरीन)

झुरिच- जगातील सर्वात धनाढ्य क्रीडा संस्था फेडरेशन इंटरनॅशनल द फूटबॉल असोसिएशनमध्ये (फिफा) कोट्यवधी डॉलर्सची 'हेराफेरी' झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी फिफाच्या सात फुटबॉल अधिकार्‍यांना स्विर्त्झलंडमधील झुरिचमध्ये अटक करण्‍यात आले. अमेरिकन सरकारच्या तक्रारीदाखल बुधवारी (27 मे) ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्‍यात आलेल्या अधिकार्‍यांवर सुमारे 10 कोटी डॉलर्सची लाच घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटक केलेल्यांमध्ये फीफाचे विद्यमान उपाध्यक्ष जेफ्री वेब यांच्यासह राफेल एसक्विवेल, कोस्टा तकास, एडवर्डो ली, युगेनियो फिगुएरेडो, ज्युलिओ रोचा, जोस मारिया मारिन यांचा समावेश आहे. अमेरिकेत फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा या सर्व अधिकार्‍यांवर आरोप आहे.

फिफातील वरिष्ठ अधिका-यांना लाचखोरीप्रकरणी अटक झाल्याच्या कारवाईचे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाने स्वागत केले.

दुसरीकडे, शुक्रवारी (29 मे) फीफाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. फुटबॉलमधील सर्व प्रकारचे गैरव्यवहार संपुष्टात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे फीफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी म्हटले आहे.

गंभीर मुद्दे
> फीफाच्या सात वरिष्ठ अधिकार्‍यांना झुरिचमधील एक हॉटेलमध्ये अटक
> नऊ अधिकार्‍यांसह 14 फीफा कर्मचार्‍यांना यूएस जस्टिस डिपार्टमेंटने लाचखोरी आणि गैरव्यवहारप्रकरणी दोषी ठरवले होते.
> 24 वर्षांपूर्वी झाला होता भ्रष्टाचार
> सुमारे 10 हजार कोटी डॉलर्सची 'हेराफेरी'
> फीफा- 2014 वर्ल्ड कपमधून 30 हजार कोटी डॉलर्सचे उत्पन्न