आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालेपकडून शारापोवा पराभूत; स्पर्धेतील आव्हान आले संपुष्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - माजी नंबर खेळाडू रशियाची मारिया शारापोवाचे चायना ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने शारापोवाला ६-२, ६-२ ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आतापर्यंतच्या आठ सामन्यांतील शारापोवाविरुद्धचा हालेपचा हा पहिला विजय ठरला. १५ महिन्यांच्या बंदीनंतर एप्रिलमध्ये पुनरागमन करणारी रशियन खेळाडूची   सध्याच्या क्रमवारीत १०४ व्या स्थानावर घसरण झाली आहे. यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या शारापोवाला चायना ओपनमध्ये वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता.  

दुसरी मानांकित हालेप सामना आता ११ व्या मानांकित एग्निजस्का रदावांस्का व डारिया कसात्किना यांच्यातील विजेत्याशी होईल.  चीनच्या पेंग शुआईने रोमानियाच्या मोनिका निकेलेस्क्यूला ६-३, ६-२ ने हरवले. नवव्या मानांकित लात्वियाच्या अॅलेना ओस्तापेंको हिने समांथा स्टोसूरला ६-३, ७-५ ने पराभूत केले.

निकची ज्वेरेकवर मात 
पुरुष एकेरीत निक किर्गियोसने जर्मनीच्या अॅलेक्जांद ज्वेरेकला ३-६, ६-२, ६-२ ने मात देत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसने सर्बियाच्या दुसान लाजोविकचा ६-३, ६-४ ने पराभव केला. स्पेनच्या रॉबर्ट बतिस्तो शानदार खेळ करत एकतर्फी विजय मिळवला. रॉबर्ट ए. बेदेनेपेक्षा ६-०, ६-० ने पुढे होता, अखेर ब्रिटिश खेळाडू बेदेने सामना सोडला.

दिविज उपउपांत्य फेरीत; युकी-नागलचा पराभव
भारताचा आघाडीचा टेनिसपटू दिविज शरणने काऊशुंग एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे युवा खेळाडू युकी भांबरी आणि सुमीत नागलला एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. डावखुरा शरण व त्याचा अमेरिकन जोडीदारासोबत जबरदस्त खेळ करत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळणारी स्थानिक जोडी जुइ चान हुंग आणि चेंग यू यू यांना अवघ्या ५० मिनिटांत ६-१, ६-४ ने पराभूत केले. एकेरीमध्ये सुमीतला तिसऱ्या मानांकित रोमानियाच्या कोपिल मारियसने ४-६, २-६ ने हरवले. युकीला ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनने ३-६, ३-६ ने नमवत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. पुरुष  दुहेरीमध्ये विष्णू वर्धन व जीवन या भारतीय जोडीला दुसऱ्या मानांकित अमेरिकेचा जेम्स सेरेटानी व ऑस्ट्रेलियाचा मार्क पोलमन्स जोडीने २-६, ४-६ ने मात दिली.
बातम्या आणखी आहेत...