आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना-मारिया शारापाेवाची ‘मिनी फायनल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - यंदाच्या सत्रातील तिसर्‍या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेला येत्या साेमवारपासून सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेत महिला एकेरीचा किताब जिंकण्यासाठी रशियाची मारिया शारापाेवा सज्ज झाली आहे.

यंदाच्या स्पर्धेत तिची वाटचाल अधिक खडतर असेल. कारण तिच्या या वाटचालीमध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे खडतर आव्हान असणार आहे. त्यामुळे २०१४ च्या विजेत्या मारिया शारापाेवाला यंदाच्या स्पर्धेत जेतेपदावर पुन्हा एकदा नाव काेरण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. जगातील नंबर वन टेनिसपटू सेरेनाला महिला एकेरीमध्ये अव्वल आणि रशियाच्या मारिया शारापाेवाला चाैथे मानांकन मिळाले आहे.

चाैथ्या फेरीत रंगणार विल्यम्स भगिनींचा सामना
महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत पाच वेळची चॅम्पियन सेरेना आणि चार वेळची व्हिनस यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे व्हिनसचे फार काळ स्पर्धेत आव्हान कायम राहणार नाही. कारण सेरेना वरचढ खेळी करून पुढच्या फेरीत आगेकूच करेल. तसेच व्हिनस बाहेर पडेल.

उपांत्य सामन्यात सेरेना-शारापाेवाची झुंज
पाच वेळची चॅम्पियन सेरेना आणि २०१४ ची विजेती शारापाेवा यांच्यात महिला एकेरीचा उपांत्य सामना रंगणार आहे. खर्‍या अर्थाने ही महिला एकेरीत ही मिनी फायनलच असेल. कारण याच उपांत्य सामन्यातील निकालावर महिला एकेरीच्या चॅम्पियनचा दावा अधिक मजबूत हाेणार आहे. त्यामुळे टेनिसच्या विश्वातील तमाम चाहत्यांसाठी हा सामना माेठी पर्वणीच ठरणारा आहे. आतापर्यंत या दाेन्ही एकूण १९ सामने झाले. यामध्ये सेरेनाने १७-२ विजयासह शारापाेवाविरुद्ध आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

पेत्रासमाेर सिमाेना हालेप
दुसर्‍या उपांत्य सामन्यात गतविजेत्या आणि दुसर्‍या मानांकित पेत्रा क्विताेवाला माेठी कसरत करावी लागेल. या वेळी तिचा सामना सिमाेना हालेपशी हाेईल. महिला एकेरीतील ही दुसरी सेमीफायनलदेखील अधिक राेमांचक हाेण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...