आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय बाॅक्सिंग चॅम्पियनशिप : शिव थापा सेमीफायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाेहा - युवा खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवताना दाेहा आंतरराष्ट्रीय बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाच्या नावे एकूण सात पदके निश्चित केली आहेत. भारताच्या सहा बाॅक्सरने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेतील एल. देवेंद्राेने अंतिम फेरी गाठली. त्याच्याकडून भारतीय संघाला सुवर्णपदकाची आशा आहे. त्याने स्पर्धेतील ४९ किलाे वजन गटात हे यश संपादन केले. आगामी वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी भारतीय युवा खेळाडू दाेहा येथे उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

आशियाई चॅम्पियन शिव थापासह गाैरव बिघुडी, मनदीप जांग्रा, मनीषकुमार, विकास कृष्णने उपांत्य फेरीत धडक मारली. मनीषकुमारने ६० किलाे वजन गटाच्या लढतीत ट्युनिशियाच्या अहमदवर मात केली.
बातम्या आणखी आहेत...