आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking Moment When Weightlifter Collapses In An Attempt To Lift

VIDEO: वेटलिफ्टिंग करताना बिघडले संतुलन, पहा कशी कोसळली जेनसिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेटलिफ्टर जेनसिस तोल गेल्‍याने अशी पडली. - Divya Marathi
वेटलिफ्टर जेनसिस तोल गेल्‍याने अशी पडली.
टोरंटो - येथे सुरू असलेल्‍या पॅन एम गेम्‍स 2015 मध्‍ये वेनेजुएला येथील 20 वर्षीय वेटलिफ्टर जेनसिस रोड्रिगेज गोमेज ही 106 किलो वजनगटात क्लिन अॅन्‍ड जर्कच्‍या प्रयत्‍नात अपयशी ठरली आणि कोसळली. मात्र, रौप्‍य पदक पटकावण्‍यात ती यशस्‍वी ठरली. यापूर्वी तीने 35 किलो वजनगटात तीन फे-या पूर्ण केल्‍या.
डोक्‍यामागे पडला बार
106 किलो वजनाच्‍या पहिल्‍या प्रयत्‍नात जेनसिस ही बार उचलण्‍‍यात अपयशी ठरली. तिने पहिल्‍यांदा खांद्यापर्यंत बार उचलला. नंतर काही वेळ ती थांबली. पुन्‍हा डोक्‍यापर्यंत तिने बार उचलला. मात्र या प्रयत्‍नामध्‍ये ती स्‍वत:ला सावरू शकली नाही नि बार तिच्‍या डोक्‍यामागे पडला. विशेष म्‍हणजे यानंतर जेनसिसने याच वजनात दूसरी फेरी पूर्ण केली. त्‍यानंतर 109 किलोची फेरीही तिने पूर्ण केली. या स्‍पर्धेत तीने रौप्‍य पदकावर आपले नाव कोरले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून व्‍हिडीओ पाहा, जेनसिसचा कसा गेला तोल..