आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: सायनाचा प्रवास रुपेरी पडद्यावर; श्रद्धा कपूर साकारणार ‘फुलराणी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॅडमिंटन कोर्टवरचे प्रसिद्धीचे वलय सिनेसृष्टीच्या झगमगत्या दुनियेत सायना नेहवालच्या जीवनावरील चित्रपटाचे आकार घेणार आहे. त्या दृष्टीने संबंधितांनी कामाला सुरुवात केली असून सायना नेहवालची पडद्यावरची भूमिका साकारण्यासाठी अखेर श्रद्धा कपूरची निवड  झाली आहे.  

सायनाच्या जीवनपटात प्रमुख भूमिका करताना श्रद्धा कपूरला फक्त अभिनयच करायचा नसून प्रत्यक्ष बॅडमिंटनही खेळायचे आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच मग ते मैदानात उतरतात, असा अनुभव आहे. अमोल गुप्ते यांनी सांगितले, ‘सायना नेहवालची कारकीर्दच एवढी रोमहर्षक आणि चित्तथरारक आहे की, त्यावर चित्रपट बनवायला मजा येईल.’  काही वेळी ‘स्टोरी’तच जबरदस्त ताकद असते. सायनाच्या बाबतीत तसे बोलता येईल. तिच्या कारकीर्दीच्या आरंभापासूनचा सारा प्रवास, तिचे पालक, सहखेळाडू, प्रशिक्षक व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर जाणून घेतला. ‘सायना’ची भूमिका करताना बॅडमिंटन कोर्टवर आपण कुठेही तांत्रिक चूक करायला नको म्हणून श्रद्धा कपूरची पावले सध्या माटुंग्याच्या बॅडमिंटन कोर्टवर पडताहेत.  

सायनाच्या भूमिकेसाठी स्वत: राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळलेल्या दीपिकाचे नाव होते. या चित्रपटाचे शूटिंग, सायनाचे करिअर हैदराबादमध्ये घडले तेथे आणि हरियाणा व मुंबईतील काही ठिकाणांवर होईल.  
 
खडतर प्रवास रुपेरी पडद्यावर!
सायना मूळची हरियाणाची. तेथील बालपण आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी कित्येक किलोमीटर्स केलेला सायकलवरचा खडतर प्रवास आणि त्यानंतर पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली सायना आपल्याला या चित्रपटात पाहावयास मिळेल. सध्या क्रीडापटूंच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची लाट आली असून बॅडमिंटन हा खेळही अपवाद राहिलेला नाही. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल, असा अंदाज आहे.
 
बातम्या आणखी आहेत...