आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shuttlers Jwala And Ashwini Canada Open Win By Upstaging Top seeded Dutch Pair

कॅनडा ओपन बॅडमिंटन: ज्वाला - आश्विनी जोडीने जिंकला किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलागरी - राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाने कॅनडा ओपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब जिंकला आहे. या तिसऱ्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत धडक मारत अव्वल मानांकित एफिई मुस्कोनेस आणि सेलेना पिईक जोडीचा 21-19, 21-16 ने पराभव केला.
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर दिली. भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये 21-19 ने सामना जिंकला. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला ज्वाला आणि आश्विनी वरचढ ठरल्या त्यांनी प्रारंभीच 5-0 ने आगेकूच केली. हा सेट 15-15 ने बरोबरीत सुटला. मात्र ज्वाला आणि आश्विनीने पुनरागमन करत 21-16 ने किताबावर नाव कोरले.
बातम्या आणखी आहेत...