आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे भारताची पहिली महिला बॉडी बिल्‍डर, लोक समजतात पुरूष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकातामध्‍ये राहणारी सिबालिका साहा ही भारताची पहिली महिला बॉडी बिल्‍डर आहे. तिला इंडियन सुपरवुमन या नावानेही ओळखले जाते. ती तिच्‍या दमदार बॉडीमुळे आज चर्चेत
आहे. 35 वर्षीय सिबालिकाने वर्ल्‍ड चॅम्‍पियनशिप 2012 मध्‍ये भाग घेतला होता. सिबालिकाला तिच्‍या पिळदार स्‍नायुंमुळे लोक पुरूष समजतात.
55 किलो वजन, 15. 5 इंच बायसेप्‍स
सिबालिकाने बॉडी बिल्‍डिंगमध्‍ये नाव कमावले आहे. भारतासाठी ती 55 किलो वयोगटात भाग घेते. 2011 मध्‍ये तिने पहिल्‍यांदा प्रादेशिक बॉडी बिल्‍डिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्‍पर्धेत ती पाचव्‍या क्रमांकावर होती. तिचे स्‍नायू 15.5 इंच आकाराचे आहेत. जे अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा सारख्‍या बॉलीवुड स्टारपेक्षाही अधिक आहेत.

पतीसोबत घटस्‍फोट
सिबालिकाच्‍या मतानुसार, ' माझे पती बॉडी बिल्‍डिंगच्‍या विरोधात होते. यामुळे दोघांचे वाद होत असत आणि नंतर घटस्‍फोटच झाला. सिबालिकाने लग्‍नानंतर पूर्ण आयुष्‍य बॉडी बिल्‍डिंगसाठी समर्पित केले आहे. तिचे लहान केस आणि पुरूषांसारखे पिळदार मसल्‍स पाहून लोक गोंधळून जातात. ती म्‍हणते की, लोकांना वाटते मी महिला नसून पुरूष आहे. त्‍यामुळे कोणी भैय्या, अंकल अशाही हाका मारतात.'

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सिबालिकाचे फोटो..