आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोक आमच्या खेळाऐवजी शरीराकडे बघतात, सिमोन बाइल्सच्या ‘करेज टू सोर : ए बॉडी इन मोशन, ए लाइफ इन बॅलेन्स’ पुस्तकाचे विमोचन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - िसमोन बाइल्स ही ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके जिंकणारी अमेरिकेची जिम्नॅस्टिकपटू आहे. देशात तिची प्रतिमा हीरोप्रमाणे आहे. येथे पोहोचण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, २०१३ मध्ये तिच्या जीवनातील सर्वात दु:खद घटना घडली. तेव्हा एका पुरुष कोचने सिमोनला “लठ्ठ’ म्हटले होते. १९ वर्षीय अमेरिकेच्या या जिम्नॅस्टिकपटू सिमोनने आपले पुस्तक “करेज टू सोर : ए बॉडी इन मोशन, ए लाइफ इन बॅलेन्स’चे विमोचन केले. यात तिने आपले जीवन आणि करिअरशी संबंधित गोष्टी लिहिल्या आहेत. आपल्या पुस्तकाच्या विमोचनाच्या वेळी तिने करिअर आणि खेळाडूंसोबत होणाऱ्या व्यवहाराबाबत मुक्त संवाद साधला.

सिमोन म्हणाली, “ज्या खेळात खेळाडू खूप कमी कपडे घालतात, त्या खेळात सहभागी होणे कठीण आहे. अशातसुद्धा लोक जिम्नॅस्टिकपटूच्या कामगिरीकडे न पाहता तिच्या शरीराकडे बघत असतात. खेळ कसा आहे, याच्याशी त्यांना काहीच देणे-घेणे नसते. माझ्यासोबत असे घडले आहे, यामुळे मी हे म्हणत आहे. अनेक जण केवळ खेळातील उणिवा शोधत असतात. आमच्या ऑलिम्पिक संघातील खेळाडू लॉरी हर्नांडेज, एली रेसमेन, गेबी डगबलस आणि मेडिसन कोसियन यासुद्धा बॉडी शेमिंगच्या बळी ठरल्या आहेत. मात्र, आमच्यावर याचा काही परिणाम झाला नाही. या शरीराच्या मदतीनेच आम्ही रिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन केले. आमच्या सर्वांची शरीररचना एकसारखी आहे, हे आम्ही सिद्ध केले आहे.’ ती म्हणाली, ‘२०१३ मध्ये एका जिम्नॅस्टिक स्पर्धेत माझी कामगिरी चांगली झाली नाही. तेव्हा माझ्या कोचने मला लठ्ठ असल्यामुळे माझे प्रदर्शन सुमार झाल्याचे सांगितले. ते ऐकून मला खूप दु:ख झाले. ते ऐकल्यानंतर मी रात्री लपून खूप रडले. नंतर अमेरिकन जिम्नॅस्टिक नॅशनल संघाच्या समन्वयक मार्था यांनी मला खूप प्रेरित केले.’

मार्थाने मला सांगितले की, “कोणी काहीही म्हटले तर त्यावर विचार करण्याची गरज नाही. देवाने आपल्याला हे शरीर दिले आहे. यामुळे सर्वांनी स्वत:वर प्रेम केले पाहिजे. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात प्रगती होईल.’
बातम्या आणखी आहेत...