आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँग अाेपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, समीर वर्माची अंतिम फेरीत धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेऊवुल - रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू व नॅशनल चॅम्पियन समीर वर्मा अाता किताबापासून अवघ्या एका पावलावर अाहेत. या दाेघांनी अापापल्या गटातील उपांत्य सामने जिंकून शनिवारी हाँगकाँग अाेपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.
चीन अाेपनची चॅम्पियन सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सिंगापूरच्या चियांग एनगानला धूळ चारली. तिने २१-१४, २१-१६ ने सरळ दाेन गेममध्ये एकतर्फी विजय संपादन केला. तिने ४६ मिनिटांमध्ये विजयश्री खेचून अाणली. अाता सिंधुचा अंतिम सामना चाैथ्या मानांकि ताई जुशी हाेईल.

सायनाच्या पराभवाची परतफेड: सिंधूने चियांगला नमवून सायनाच्या पराभवाचा वचपा काढला. चियांगने एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सायनाला पराभूत केले हाेते.
समीर ४५ मिनिटांत फायनलमध्ये : नॅशनल चॅम्पियन समीर वर्माने ४५ मिनिटांमध्ये पुरुष एकेरीची फायनल गाठली. त्याने उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जान जाॅर्गेनसनला २१-१९, २४-२२ ने धूळ चारली. त्याने पहिला गेम जिंकून २१ मिनिटांमध्ये अाघाडी घेतली. त्यानंतर त्याने २४ मिनिटांत दुसऱ्या गेममध्ये बाजी मारली. यासह त्याने सामना अापल्या नावे केला.

भारताला दुहेरी मुकुटाची संधी : हाँगकाँग अाेपनमध्ये भारताला दुहेरी मुकुटाची संधी अाहे. भारताचे दाेन खेळाडू हे महिला व पुुरुष एकेरीच्या किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात अाहेत. यात सिंधू व समीर वर्माचा समावेश अाहे. त्यांनी अापापल्या गटातील अंतिम फेरी गाठली.
बातम्या आणखी आहेत...