आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू, सायनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक, ज्वाला-अश्विनी विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- भारतीय बॅडमिंटनची शान सायना नेहवाल आणि पी. व्ही. िसंधू यांनी वर्ल्ड बॅडमिंटनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. सिंधूने संघर्षपूर्ण सामन्यात धक्कादायक विजय मिळवताना अव्वल मानांकित चीनच्या जुईरुईला हरवले. दुसऱ्या प्री क्वार्टर फायनलमध्ये सायनाने जपानच्या सायाका ताकाहाशीला मात दिली. महिला दुहेरीतही ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी अंतिम आठमध्ये प्रवेश केला.
सिंधूने दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन केले. दुसरा गेम गमावल्यानंतर तिसऱ्या गेममध्ये सलग सहा गुण मिळवले. तिने एक वेळ रुईवर १२-७ ने आघाडी मिळवली होती. नंतर ितने २१-१७ सह सामनाही जिंकला. सिंधूने ५० मिनिटांत विजय मिळवला.

सायनाने चौथ्यांदा सायाकाला हरवले
जागतिक क्रमवारीत नंबर दोन सायनाने जपानच्या सायाका ताकाहाशीला ४७ मिनिटांत २१-१८, २१-१४ ने हरवले. सायनाने यासह ताकाहाशीविरुद्ध विजयाचे गणित ४-० असे केले. सायनाला ताकाहाशीने पहिल्या गेममध्ये लढत देत ७-० ने आघाडी घेतली.

ज्वाला-अश्विनीची कमाल
महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या आठव्या मानांकित जोडीने जपानची रिका काकिवा-मियुकी मेईदा यांना २१-१५, १८-२१, २१-१९ ने हरवले.
सायना, सिंधू यांनी एकेरीत, तर ज्वाला-अश्विनी यांनी महिलांच्या दुहेरीत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. वर्ल्ड बॅडमिंटनमध्ये भारताच्या बऱ्याच खेळाडू क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.