आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू दुसऱ्यांदा उपविजेती; चॅम्प ताईची हॅट‌्ट्रिक! हाँगकाँग अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेवलून (हाँगकाँग)- रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूला सलग दुसऱ्या वर्षीही हाँगकाँग अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला रविवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ती उपविजेती ठरली. अव्वल मानांकित ताई जू यिंगने सरस खेळी करताना सलग दुसऱ्यांदा अाणि तिसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने ४४ मिनिटांत २१-१८, २१-१८  ने  विजय संपादन केला. दरम्यान सिंधूने विजयासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे तिला पराभवाला सामाेरे जावे लागले.    


ताई येन तिसऱ्यांदा चॅम्पियन

अव्वल मानांकित ताई येन ही सलग दुसऱ्यांदा अाणि अाेव्हरअाॅल तिसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन ठरली. यापूर्वी, तिने २०१६ अाणि २०१४ मध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला हाेता. यासाठी तिला माेठी झुंज द्यावी लागली.मात्र,  तिने यंदा फायनलमध्ये सहज बाजी मारली.   


सिंधूचा दुसरा प्रयत्न अपयशी 
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा पल्ला गाठला हाेता. मात्र, तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. तिला गत वर्षी अाणि यंदाही ताई जू येनविरुद्ध फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला.   
ली चाेंग वेई विजेता : अाठवा मानांकित ली चाेंग वेई हा पुुरुष एकेरीत विजेता ठरला. त्याने फायनलमध्ये चेन लाेंगवर २१-१४, २१-१९ अशा फरकाने मात केली. 

बातम्या आणखी आहेत...