आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन अाेपन बॅडमिंटन स्पर्धा : चीनमध्ये भारताच्या सिंधूचे साम्राज्य!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुझव्हाे (चीन) - रिओ अाॅलिम्पिकमधील राैप्यपाठाेपाठ अाता सिंधूने अवघ्या दाेन महिन्यांत पुन्हा एकदा एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. तिने रविवारी चीन अाेपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा किताब जिंकला. तिने फायनलमध्ये चीनच्या सून यूचा पराभव केला.

सातव्या मानांकित सिंधूने २१-११, १७-२१, २१-११ अशा फरकाने सामन्यात राेमहर्षक विजय संपादन केला. तिने ६९ मिनिटांमध्ये अजिंक्यपदावर नाव काेरले. रिअाेतील पदकानंतर तिचे हे पहिले विजेतेपद ठरले. यापूर्वी दाेन माेठ्या स्पर्धांमध्ये अपयशाचा तिला सामना करावा लागला. रुवात केली. त्यामुळे तिला पहिल्या गेममध्ये सहज बाजी मारता अाली. यामुळे तिने लढतीत अाघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर तिला ही लय कायम ठेवता अाली नाही. कारण चीनच्या सुनने अापल्या घरच्या मैदानावर शानदार पुनरागमन करताना लढतीत बराेबरी साधली. तिने दुसरा गेम २१-१७ ने जिंकून सिंधूला राेखले. मात्र, त्यानंतर तिसऱ्या अाणि निर्णायक गेममध्ये तिला सुमार खेळीचा फटका बसला. सिंधूने शानदार खेळी करताना हा गेम जिंकून सामना अापल्या नावे केला. याशिवाय तिला अजिंक्यपदाचा बहुमान पटकावता अाला.

सलग तिसऱ्या वर्षी भारतीय खेळाडू फायनलमध्ये
सिंधूच्या रूपाने सलग तिसऱ्या वर्षी भारतीय महिला खेळाडूला चीन अाेपनच्या फायनलमध्ये प्रवेश करता अाला. यामध्ये सायनाचा समावेश अाहे. तिने २०१४ अाणि २०१५ मध्ये चीन अाेपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला हाेता. त्यानंतर यंदा सिंधूने ही कामगिरी केली. याशिवाय तिने फायनलमध्ये विजय मिळवला.

चीनचे वर्चस्व धाेक्यात
या स्पर्धेत चॅम्पियन ठरणारी सिंधू ही तिसरी बिगरचिनी खेळाडू ठरली. यापूर्वी भारताच्या सायना अाणि मलेशियाच्या वांगने या स्पर्धेत एकेरीचा किताब जिंकला. अातापर्यंत २६ पैकी २३ वेळा चीनच्या महिला खेळाडूने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

दुसरी भारतीय खेळाडू
चीन अाेपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे विजेेतेपद जिंकणारी सिंधू ही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. यापूर्वी सायनाने २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले हाेते. २०१५ मध्ये सायनाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते.

माेदींकडून काैतुकाचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सिंधूवर काैतुकाचा वर्षाव केला. ‘पहिला सुपर सिरीज किताब जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन. चीन अाेपनमध्ये तू चांगली खेळी केली,’ अशा शब्दात माेदी यांनी खास टि्वट करून अभिनंदन केले.
बातम्या आणखी आहेत...